अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2022 Farmer succes story :गत दोन वर्ष कोरोनामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा विपरीत परिणाम बघायला मिळाला. यामुळे शेती क्षेत्राला (Farming) देखील मोठा फटका बसला होता.

अनेक शेतकरी बांधवांना अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आपला शेतमाल कोरोनाच्या निर्बंधामुळे विक्री करता आला नाही यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) लाखो रुपयांचे नुकसान झाले.

मात्र अपयश ही यशाची पहिली पायरी असते. रात्र झाली तर दिवस देखील उजाडणारच अगदी याच उक्तीप्रमाणे रायगड जिल्ह्यातील एका नवयुवक शेतकऱ्याने कार्य केले आहे.

कोरोना काळात रायगड जिल्ह्याच्या (Raigad Farmer) सुधागड तालुक्यातील (Raigad News) मौजे वाघोशी येथील रहिवाशी शेतकरी उच्चविद्याविभूषित अभिजित देशमुख यांना दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊन असल्यामुळे झेंडूची विक्री करता येणे शक्य झाले नव्हते.

त्यावर्षी अभिजित यांनी मोठ्या कष्टाने तसेच योग्य नियोजनाणे झेंडूची यशस्वी उत्पादन घेतले होते. मात्र निर्बंध असल्यामुळे त्यांना आपला सोन्यासारखा झेंडु विक्री (Marigold) करता आला नाही.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीमुळे अभिजीत थोडे हसले आणि त्यांनी गतवर्षी झेंडूची लागवड केली नाही. मात्र यावर्षी नवीन जोमाने अभिजित यांनी झेंडूची लागवड (Marigold Farming) केली आणि अवघ्या दोन महिन्यात झेंडूच्या पिकातून दर्जेदार असे एक लाख रुपयांचे उत्पन्न देखील आपल्या पदरात घेतले आहे.

मागील दोन वर्ष अभिजीत यांचे जे नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी यंदा अभिजित यांनी कंबर कसली आणि 28 डिसेंबर रोजी झेंडूची लागवड करून टाकली.

त्यांनी आपल्या वडिलोपार्जित दहा गुंठे शेतीत झेंडूची लागवड करण्याचे ठरवले आणि एवढ्या क्षेत्रात त्यांनी 2 हजार झेंडूची रोपे लावली.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या सल्ल्यानुसार झेंडूंच्या रोपांमधील अंतर, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन या सर्व बाबींची दक्षता घेतली आणि अवघ्या दोन महिन्यात झेंडूचे पीक उत्पादनासाठी तयार झाले.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात झेंडूची हार्वेस्टिंग सुरु झाली. दिवसाला तीस किलो झेंडूची हार्वेस्टिंग अभिजित यांनी केली आणि त्याची विक्री किरकोळ तसेच घाऊक बाजारात केली.

अभिजीत यांना दहा गुंठे क्षेत्रात लावलेल्या झेंडू पिकासाठी सुमारे 30 हजार रुपयांचा खर्च आला. यातून त्यांना 1 लाख 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले अर्थात 85 हजारांचा निव्वळ नफा अभिजीत यांना राहिला.

यामधून अधिक उत्पादन मिळवता येणे शक्य झाले असते जर त्यांच्याकडे पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध राहिला असता. याबाबत अभिजित यांनी खंत व्यक्त केली मात्र मिळालेल्या उत्पन्नात अभिजीत निश्चितच समाधानी आहेत.

निश्चितच काळाच्या ओघात केलेला अभिजीत यांचा हा बदल आणि त्यासाठी केलेले परिश्रम तसेच नियोजन यामुळे अभिजीत यांना अल्प कालावधीत चांगले उत्पन्न मिळाले आहे.