file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- पावसानं दडी मारल्यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यासमोर आता नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान सततच्या पावसानं शेतातील पिकं पिवळी पडली आहेत. बीड, औरंगाबाद,परभणी, जालना,लातूर, उस्मानाबाद, जालना,हिंगोली,नांदेड जिल्ह्यातील पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सततच्या पावसानं चिंता वाढली आहे.सततच्या पावसाने पिके पिवळी पडली आहेत.

बीड, औरंगाबाद,परभणी, जालना,लातूर, उस्मानाबाद, जालना,हिंगोली,नांदेड जिल्ह्यात सातत्यानं पाऊस होत असल्यानं पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने कापूस,

सोयाबीन,तूर,मूग,उडीद,पिकांना धोका निर्माण झाला आहे. चार दिवसांपासून सतत पाऊस होत असल्यानं शेताचे तळे झाले आहे. पाऊस असा कायम राहिल्यास आणि पिकांमध्ये पाणी साचल्यास पिकांचं मोठ्य़ा महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतीच्या नुकसानाचे पंचनामेही 48 तासांत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्याचे राज्याच्या कृषी विभागानं आदेश दिले आहेत.