Farming Business Idea : अलीकडे फळांची मागणी मोठी वाढली आहे. यामुळे शेतकरी बांधव देखील शेतीमध्ये आता काळाच्या ओघात मोठा बदल करत फळ लागवडीकडे आपला मोर्चा वळवत आहेत. शेतकरी बांधव आता विदेशी फळ पिकांची देखील शेती करू लागले आहेत.

यामध्ये किवी या फळाचा देखील समावेश आहे. डेंग्यू या आजारात अतिशय उपयुक्त असलेल्या या फळाला बाजारात मोठी मागणी असते शिवाय चांगला दरही मिळतो. यामुळे अलीकडे महाराष्ट्रात देखील प्रायोगिक तत्त्वावर या फळाची शेतकऱ्यांनी लागवड करून पाहिली आहे.

काहो शेतकऱ्यांना यामध्ये यश देखील मिळाले आहे. अशा परिस्थितीत आज आपण किवी लागवडीतील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

सर्वप्रथम किवीचे फायदे तर जाणून घ्या 

किवीमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-के मुबलक प्रमाणात असते. पोटॅशियम आणि फोलेट सारख्या पोषक तत्वांचा देखील हा एक उत्कृष्ट स्रोत आहे. त्याची चव आंबट आणि गोड आहे, ज्याच्या वापरामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे शरीराला विविध आजारांपासून वाचवण्यास मदत होते. विशेषत: डेंग्यू, मलेरिया किंवा कोणत्याही संसर्गामध्ये किवीचे सेवन केल्याने खूप आराम मिळतो.

या ठिकाणी किवीची शेती होते बर 

किवी फळाचे मूळ चीन आहे, येथून किवीला जगभरात ओळख मिळाली आहे. तसे पाहता, किवीची किंमत इतर फळांच्या तुलनेत थोडी जास्त असते. पण याचा परिणाम किवीच्या मागणीवर झाला नाही.

माती आणि हवामानानुसार हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड, केरळ, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांमध्ये किवीची लागवड केली जात आहे. महाराष्ट्रात देखील काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर या फळाची लागवड करून पाहिली असून काही शेतकऱ्यांना यामध्ये यश देखील मिळाले आहे.

अशा पद्धतीने शेती करा

किवीची लागवड करण्यासाठी प्रथम शेत तयार केले जाते. त्यात खते टाकून माती सुपीक बनवली जाते. यानंतर रोपे लावली जातात. तज्ञ म्हणतात की किवीच्या झाडांची 2 ते 3 वर्षे चांगली काळजी घ्यावी लागते. त्याच्या झाडाला साधारण ५ वर्षांनी फळे येतात. जेव्हा झाड 10 वर्षांचे असते तेव्हा ते 50 किलो फळे देते.

किवी झाडांपासून फळांचे उत्पादन पूर्णपणे किवीच्या जातीवर आणि काळजीवर अवलंबून असते.

किवी बागेत सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे चांगले असते.

उन्हाळ्यात किवी बागेत रूट रॉट, कॉलर रॉट, क्राउन रॉट या रोगांचा धोका वाढतो.

किवी बागेच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करावी लागते.

किवीच्या शेतीतून किती उत्पन्न मिळत बर 

किवीची व्यावसायिक शेती केल्यास ७ वर्षांत नफा सुरू होतो. बाजारात किवी 200 ते 300 रुपये किलो दराने विकली जात आहे. किवीचे एक फळ 20 ते 35 रुपयांना मिळते. ही फळे सहसा लवकर मऊ होतात, म्हणून काढणीनंतर योग्य पॅकेजिंग करणे फार महत्वाचे आहे.

हे फळ कमी पिकलेले किंवा कडक असतानाच तोडले जाते, कारण ते आपोआप पिकते आणि बाजारात येईपर्यंत मऊ होते.

सुरुवातीला किवीची लागवड करून 75 हजार ते 1 लाखांपर्यंत नफा मिळतो, मात्र हळूहळू केवळ 2 एकर बागेतून 10 ते 12 लाखांची कमाई होऊ शकते.