Farming Business Idea : आजकाल शेतकरी पारंपरिक शेतीपासून (Traditional Farming) दूर जात अत्याधुनिक शेतीचा विचार करू लागले आहेत. शेतकरी (Farmer) त्या पिकांची लागवड करतात, ज्यामध्ये जास्त नफा असतो. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वाटा आहे.

दरम्यान मायबाप सरकार शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी अनेक योजना (Farmer Scheme) राबवत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही शेती करून चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळवायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला व्यवसायाची कल्पना देत आहोत, ही आहे मशरूम लागवडीची (Mushroom Farming) कल्पना. घराच्या चार भिंतीतही तुम्ही हे करू शकता.

मात्र त्याची लागवड करण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणाची (Mushroom Farming Training) आवश्यकता असेल. या पिकाच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तुम्ही 5000 रुपये गुंतवूनही त्याची लागवड सुरू करू शकता. गेल्या काही वर्षांत मशरूमची मागणी खूप वाढली आहे. त्यामुळे मशरूम शेतीचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.

मशरूम शेती कशी करावी

ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत त्याची लागवड केली जाते. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी गहू किंवा तांदळाच्या पेंढ्यामध्ये काही रसायने मिसळून कंपोस्ट खत तयार केले जाते. हे कंपोस्ट तयार होण्यासाठी सुमारे 1 महिना लागतो. यानंतर, मजबूत जागेवर 6-7 इंच जाडीचा थर देऊन, त्यात मशरूमच्या बिया लावल्या जातात, ज्याला स्पॉनिंग देखील म्हणतात. बिया कंपोस्टने झाकल्या जातात. सुमारे 50 दिवसांनी मशरूम काढणीसाठी विकसित होते आणि मग ते विक्रीसाठी नेले जाते. मशरूमची लागवड उघड्यावर केली जात नाही, मात्र तुम्ही याची खोलीत लागवड करू शकता.

तुम्ही यासाठी प्रशिक्षणही घेऊ शकता

मशरूम शेतीचे प्रशिक्षण जवळपास सर्व कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठांमध्ये दिले जाते. जर तुम्हाला त्याची लागवड मोठ्या प्रमाणात करायची असेल तर तुम्ही त्याचे प्रशिक्षण घेतले तर बरे होईल. त्याच्या लागवडीच्या जागेबद्दल सांगायचे तर, प्रति चौरस मीटर 10 किलो मशरूम आरामात पिकवता येते.

नफा किती होईल

याच्या लागवडीतून मिळणाऱ्या नफ्याबद्दल बोलायचे तर मशरूम शेती हा एक चांगला नफा देणारा व्यवसाय आहे, या व्यवसायातून तुम्ही तुमच्या खर्चाच्या 10 पट कमवू शकता. तुमच्या जवळच्या भाजी मंडईत किंवा हॉटेलमध्ये विकून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. ऑनलाइन भाजी विक्री वेबसाइटवरूनही त्याची विक्री करता येईल.