अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोविड काळात तहसीलदार प्रदीप पवार व प्रांत दाभाडे यांनी योग्य उपाय योजना न केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील अनेक निरपराध लोकांचे बळी गेले आहेत.

त्या सर्व परिस्थितीला तहसीलदार व प्रांत हे दोघे आधिकारी या परिस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप नाहाटा व भोस यांनी करत जिल्हाधिकारी यांकडे दि.३१ मे रोजी तक्रार दाखल केली होती. तसेच दि.५ जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

त्यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.श्रीगोंदा तालुक्यात काही खासगी हॉस्पिटल मध्ये बेसुमार लूट करण्यात आली त्यावर प्रशासकीय प्रमुख म्हणून तहसीलदार यांनी कोणतेही नियंत्रण ठेवले नाही.

त्यामूळे तालुक्यातील काही रुग्ण दगावले.तालुक्यातील खासगी कोविड सेंटर, खासगी रुग्णालय सरकारी दवाखाने, व तालुक्यातून इतर ठिकाणी नगर, दौंड, शिरूर, कर्जत, आष्टी अशा अनेक ठिकाणी रुग्ण दगावले. काही अत्यवस्थ रुग्णांना उपचाराअभावी घरी आणले त्यात ते मृत्यमुखी पडले आहेत.

अशी मोठी आकडेवारी असताना प्रत्यक्षात मात्र कमी आकडेवारी दाखवून तहसीलदार व प्रांत हे दिशाभूल करत आहेत.

त्यामुळे तहसीलदार व प्रांत यांना जबाबदार धरत नाहाटा व भोस यांनी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मृत्यूचे ऑडिट करण्याचा आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिला आहे. त्यामुळे हे उपोषण देखील रद्द केले आहे.