अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- कर्जत तालुक्यात दहशत माजविणार्या युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करत पोलिसांनी दहशत माजविणार्याना अद्दल घडविण्यासाठी जोरदार कारवाई केली आहे.

सद्गुरूकृपा फर्निचर मधील कामगारांना व मला स्वतःला तलवारीने, लोखंडी रॉडने व लाकडी दांडक्याने मारहाण करून दहशत पसरवल्याबाबतची तक्रार पांडुरंग वालचंद कानगुडे वय 32 वर्षे, राहणार कानगुडवाडी, राशिन यांनी कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.

त्यानुसार पोलसांनी तपास सुरु करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यातील काही आरोपीना अटक केली आहे. अटक केलेल्यामध्ये शक्ती उर्फ विशाल अशोक अडसूळ, (24 वर्षे), करण दत्तात्रय चव्हाण,

(24 वर्षे), विशाल दीपक माने, (वय 23 वर्षे),पप्पू उर्फ राहुल बाळासाहेब कदम, (25 वर्षे), प्रशांत तात्या कोल्हटकर, (24 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

दरम्यान सागर लक्ष्मण जाधव, रा. राशीन हा फरार आहे. वरील सर्व आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील आरोपी नामे शक्ती उर्फ विशाल अडसूळ आणि पप्पू उर्फ राहुल बाळासाहेब कदम यांच्यावर यापूर्वीचे प्रत्येकी 3 गुन्हे दाखल आहेत.