अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक सीताराम गायकर यांनी नुकताच पक्षांतर केले आहे. यामुळे नाराज माजी आमदार वैभव पिचड यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.

पिचड म्हणाले कि, त्यांनी कधीही समाजहिताचे काम केले नाही. स्वतःची घरे भरण्यासाठी राजकारण केले. स्वतःचे उद्योग-व्यवसाय वाढविले. लाभाचे पद दिले तरच हे खूष.

मनाप्रमाणे पद मिळाले नाही, तर हे कुणाचेच नाहीत. त्यामुळे त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये.” लोकांचा विरोध होता तरी त्यांना पदे दिली.

ही आमची एकप्रकारे चूकच झाली काय, असा सवाल करीत त्यांनी जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक सीताराम गायकर व बाजार समितीचे सभापती परभत नाईकवाडी यांच्यावर टीका केली.

तालुक्‍यातील विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. तालुक्‍यातील विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री मधुकर पिचड यांनीच प्रयत्न केले. सध्या सुरू असलेली विकासकामेही माझ्या काळात मंजूर झालेली आहेत.

विद्यमान आमदारांनी कामे मंजूर करून आणावीत व मग त्यावर बोलावे. त्यांना अर्थसंकल्पात तालुक्‍यातील विकासकामांना निधी देखील आणता आला नाही.असे पिचड म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर