file photo

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  अनेक देशात लसीकरण झाले तरी देखील तेथे धोका वाढत आहे. आपण सुरुवातीपासून काळजी घेत आहोत. तिसऱ्या लाटेचा धोका आहे असे म्हंटल जातंय, नागरिकांची जीवितहानी टाळणे हे महत्वाचे आहे.

थोडीशी ढिल दिली की लोक गैरफायदा घेतात. असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते निर्णय घेतील. सर्वांना त्रास होत आहे. हातावर पोट असलेल्यांना याचा अधिक त्रास आहे. व्यापाऱ्यांना त्रास होतोय.

पण समाजाच्या हिताचे, त्यांच्या जीविताचे काय याचा देखील विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत. महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी राजेश देशमुख उपस्थित होते.