Krushi News Marathi:- शेतीसोबतच (Farming) पशुपालन (Animal Husbandry) हे शेतकऱ्याच्या उपजीविकेचे अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे.

खरं पाहता शेतीच्या अगदी प्रारंभीपासून पशुपालन केले जात आहे. त्याशिवाय शेतकरी बांधवांना (Farmers) या महागाईच्या काळात उदरनिर्वाह भागवणे देखील मोठ्या मुश्कीलीचे झाले आहे.

विशेषतः शेळीपालनाबद्दल (Goat Rearing) बोलायचे झाले तर लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी हा एक उत्तम व्यवसाय (Business) आहे. खेड्यातील शेतकरी बांधव बकरीला गरिबांची गाय असेही म्हणतात.

आजच्या लेखात आपण या गरिबांच्या गायी म्हणजेच शेळीपालनाबद्दल सविस्तर जाणुन घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया शेळीपालनाशी संबंधित सर्व महत्वाच्या बाबी.

शेळीपालनाबद्दल सविस्तर बोलायचे तर हा असा व्यवसाय आहे, जो अगदी सहज आणि कमी खर्चात सुरु करता येतो. त्यासाठी फारसा चारा आणि जागा लागत नाही, कारण शेळी हा आकाराने लहान प्राणी असून तो गावभर फिरून पोट भरतो.

शेळीपालन हे शेतकऱ्यांसाठी कमाईचे सर्वात अचूक साधन आहे, परंतु आता शेळीपालन सुरु करण्यासाठी खर्च तर करावा लागेलचं. मात्र अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे शेळी पालन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसतो.

यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमच्या शेळीपालन व्यवसायाच्या गरजेनुसार बँकेकडून कर्ज मिळवण्याच्या पद्धती बद्दल सांगणार आहोत. एवढेच नव्हे तर या कर्जाच्या व्याजावर शासनाकडून अनुदानाचा लाभही दिला जातो.

शेळीपालनासाठी या बँका कर्ज देतात:- शेळीपालनासाठी कर्ज देणाऱ्या प्रमुख बँकांची नावे पुढीलप्रमाणे…

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

IDBI बँक

कॅनरा बँक

व्यावसायिक बँक

प्रादेशिक ग्रामीण बँक

राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक

स्टेट बँक सहकारी

नागरी बँक

शेळीपालनात तुम्हाला कोणत्या गोष्टींसाठी कर्ज मिळू शकते?:- शेळी खरेदी करण्यासाठी, चारा खरेदीसाठी, शेड बांधण्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता. यामध्ये सरकारी कर्ज आणि व्यावसायिक कर्जांचा समावेश आहे.

बँक दोन प्रकारचे कर्ज देते:- शेळीपालनासाठी बँकेकडून दोन प्रकारे कर्ज दिले जाते. शेळीपालन सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते त्याला व्यवसाय कर्ज म्हणतात. कर्जाचा दुसरा प्रकार म्हणजे खेळते भांडवल कर्ज, जे शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी दिले जाते. म्हणजेचं तुम्ही तुमच्या गरजेनुसार बँकेकडून कर्ज घेऊ शकता.

शेळीपालन करण्यासाठी किती कर्ज मिळू शकते:- शेळीपालनासाठी वेगवेगळ्या बँका ग्राहकांना त्यांच्या विहित नियमांच्या आधारे ठराविक रकमेचे कर्ज उपलब्ध करून देतात.

यामध्ये आयडीबीआय बँकेकडून शेळीपालनासाठी 50 हजार ते 50 लाख रुपयांचे कर्ज घेता येते. दुसरीकडे, इतर बँका त्यांनी ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत कर्ज देतात.

बँकेकडून कर्ज घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे:- 4 पासपोर्ट आकाराचे फोटो असणे आवश्यक आहे.

मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट असणे आवश्यक आहे.प

त्ता पुरावा असणे आवश्यक आहे.

उत्पन्नाचा दाखला असावा.

आधार कार्ड आवश्यक आहे.

बीपीएल कार्ड, उपलब्ध असल्यास

जात प्रमाणपत्र, SC/ST/OBC असल्यास

अधिवास प्रमाणपत्र

शेळीपालन प्रकल्प अहवाल

जमीन नोंदणी दस्तऐवज

कर्जासाठी अर्ज कसा करावा:- जर तुम्हाला शेळीपालन योजनेअंतर्गत कर्ज मिळवायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा ब्लॉक ऑफिसला भेट देऊन अर्ज मिळवावा लागेल.

अर्ज प्राप्त केल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट करावी लागेल. यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती अर्जासोबत जोडल्या जाऊ शकतात आणि ब्लॉक हेड किंवा ग्रामपंचायतीला सादर केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही शेळीपालन योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला कर्ज आणि अनुदानाचा लाभ दिला जाईल.