अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-राज्यातील हॉटेल व मॉल्स सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री १० वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे. आता १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे,

अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक झाली.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थितीत होते. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पण राज्यातील सर्व धार्मिकस्थळे आणि सिनेमागृह (थिएटर आणि मल्टिप्लेक्स) पुढील निर्णय जाहीर होईपर्यंत बंद राहणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

याआधीच कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस घेऊन दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास उपनगरीय रेल्वेतून अर्थात लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी देणार असल्याची घोषणा राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

बैठकीतील महत्वाचे निर्णय

अनाथांना १ टक्का आरक्षणाचाही निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

धार्मिकस्थळ तूर्तास बंदच राहणार आहेत.

करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे

करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे.

मॉल्स १५ ऑगस्टनंतर सुरु होणार आहे.

मॉल्समध्ये जाणाऱ्यांचे लसींचे दोन डोस घेतलेले असले पाहिजे.

सरकारी कार्यालय शंभर टक्के उपस्थितीत सुरु राहणार आहे.

खाजगी कार्यालयांना २४ तास सुरु राहण्यास परवानगी

जिम, इनडोअर स्टोडियम ५० टक्क्यांच्या उपस्थितीत परवानगी

सिनेमागृह आणि नाट्यगृह पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे.