अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी शांत, पुरेशा झोपेला पर्याय नाही. आनंदी वृद्धत्व हवे असले तरी त्याचा संबंध झोपेबरोबरच असतो.

किंबहुना, आपली रोगप्रतिकारशक्‍तीसुद्धा झोपेवर अवलंबून असते. पुरेशी झोप न मिळाल्यास त्याचे परिणाम शारीरिक आणि मानसिक पातळीवर होतात.

आळस येणे, थकवा वाटणे ही शारीरिक तर चिडचिड, राग ही मानसिक लक्षणे दिसतात. मात्र कामाचे वाढते तास, विविध स्क्रीनचा वाढता वापर आणि तणावांमुळे अनेकांना शांत आणि पुरेशी झोप मिळत नाही.

त्यातून आरोग्य बिघडत जाते. सध्या चा विचार केला तर दर पाचपैकी एक जण अपुऱ्या झोपेच्या समस्या बरोबर झुंजत आहे.

उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे अत्यावश्यक असते. तिच्या अभावी स्थौल्य, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्मृतिभ्रंश यासह अनेक विकार होऊ शकतात.

चांगली झोप मिळविण्यासाठी (good sleep tips in marathi) काही नैसर्गिक उपाय आहेत. ते समजून घेण्यापूर्वी आपल्याला झोप कशी येते, ते जाणून घेऊ.

मानवी शरीरातील मेलाटोनिन’ या संप्रेरकामुळे आपल्याला झोप येत असल्यामुळे त्याला झोपेचे संप्रेरकच म्हणतात. आपल्या शरिरात योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात हे संप्रेरक स्रवल्यामुळे आपल्याला झोप येते.

मात्र, तणावात असलेल्या व्यक्तींच्या शरिरात हे मेलाटोनिन’ योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात स्रवत नसल्यामुळे त्यांना झोप येत नाही.

काही पदार्थ आणि सुकामेवा तुम्हाला चांगल्या झोपेसाठी मदत करतो. येथे सांगितलेले उपाय केलेत तर शरीरातील ‘मेलाटोनिन ‘ योग्य प्रमाणात स्रवते आणि झोपेचे समाधान मिळेल.

» पिस्ते :- या सुकामेवामध्ये झोपेला मदत करणारी संप्रेरके भरपूर असतात. दिवसातून दोनदा पिस्ते खाल्ठेत तर झोप चांगली येते.
» जायफळ :- हा पदार्थ ही चांगल्या झोपेसाठी उपयुक्‍त आहे. जायफळाची पूड करा आणि कोणत्याही मोसमी फळावर एक चतुर्थांश चमचा ही पूड रोज सायंकाळी टाकून ते फळ खावे.

» कोहळ्याच्या बिया : – आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्‍तीचा विचार केला तर कोहळ्याच्या बिया फार उपयुक्त आहेत. यात जस्त आणि ‘ ट्राप्टोफान ‘ नावाचे खनिज भरपूर असतात.

या दोन्हींच्या संयोगातून सेरोटोनिन ची निर्मिती होऊन त्यातून ‘ मेलाटोनिन ‘ तयार होते. ते स्रवल्यामुळे झोप चांगली येते. त्यामुळे रोज तीन-चार चमचे कोहळ्याच्या बिया खाल्ल्या तर झोपेची समस्या दूर होईल.

» केळीचे पाणी : – सालीसकटची दोन केळी घेऊन त्यांचे तीन-चार तुकडे करा. हे तुकडे एक लिटर पाण्यात टाकून ते पाणी दहा मिनिटे उकळावे. नंतर केळी टाकून द्या आणि ते पाणी एका वेळी ग्लासभर प्यावे. एका महिन्यात त्याचे परिणाम दिसायला लागतील. या उपायामुळे शरीरात ‘ मेलाटोनिन ‘ नैसर्गिकरीत्या स्रवले लागेल.

» डाव्या नाकपुडीने श्‍वास घेणे : – उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्‍वास घ्यावा आणि त्याच नाकपुडीतून सोडावा.

झोपण्यापूर्वी रोज ३0-४0 वेळा हा प्रयोग करावा. डाव्या नाकपुडीने घेतलेला श्‍वास मेंदूच्या उजव्या बाजूला जातो आणि त्यामुळे झोप येण्यास मदत होते. या क्रियेमुळे रक्‍ताभिसरण सुधारते तसेच रक्‍तदाब कमी होतो.

हे सगळे करतानाच योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मानसिक तणाव टाळणे, या चार गोष्टींकडेही दुर्लक्ष करू नका. आपले आरोग्य सदैव उत्तम राखणे हेच आपले ध्येय असावयास हवे.