file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  बदलती जीवनशैली, बदलता आहार, सतत अनेक तास काम करणे, झोप पूर्ण न होणे अथवा मोबाईल-कम्प्युटरवर तासन् तास बसण्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागू लागला आहे.

मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या चष्म्याचा नम्बर कमी कराल आणि तुमची दृष्टी सुधारेल. जाणून घेऊयात –

  • १. आवळा: – आवळ्यामध्ये असलेले घटक डोळ्यांसाठी वरदान ठरतात. कच्च्या आवळ्याचा आपल्या डाएटमध्ये समावेश करा किंवा सकाळी रिकाम्या पोटी आवळा रस प्या. हे संपूर्ण आयुष्याभर दृष्टी स्थिर ठेवेल.
  • २. इलायची: – इलायचीचे सेवन केल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते आणि डोळे थंड होतात. दररोज इलायचीचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. आपण इलायची पावडर थंड दुधात मिसळू शकता.
  • ३. अक्रोड: – अक्रोडाचे तुकडे ओमेगा 3 फॅटी एसिड्स आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध असतात. हे खाल्याने डोळ्यांची दृष्टी सुधा रते.
  • ४. गाजर: – गाजराचा रस पिणे आरोग्यासाठी तसेच डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. दररोज एक ग्लास गाजर रस पिल्याने डोळ्याचा चष्मा दूर होऊ शकतो.
  • ५. जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या.
  • ६. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा.
  • ७. ३-४ हिरव्या वेलची एक चमचा बडिशोपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या.
  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
  • फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम