Ahmednagar Hospital Fire  :- अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणत आग लागून जवळपास पाच पेशंट मृत्यूमुखी पडले आहे.

मागील काळात राज्यात अशाच प्रकारच्या घटना घडत होत्या त्या वेळेस संपूर्ण हॉस्पिटलची राज्यातील फायर ऑडिट करुण घेण्याचे आदेश आरोग्यमंत्री यांनी दिले होते.

तरी सुद्धा अहमदनगर ची शासकीय अधिकारी,  गहाळ राहिले या सिव्हील हॉस्पिटलचे फायर ऑडिट झालेले आहे का नाहि , झाले असेल तर दर सहा महिन्याला फायर यंत्र सुरळीत चालतात

का नाही याची खात्री करून घेतली गेली पाहिजे होती  इलेक्ट्रिक यंत्रणा सुरळीतआहे का नाही त्याचे ऑडिट सुध्दा वारंवार करणे गरजेचे होते परंतू असे काही झालेले दिसत नाही.

मागच्या दोन दिवसांपूर्वीच सिव्हील सर्जन यांच्या गाडीला हॉस्पिटलच्या आवारात पार्किंग मध्ये आग लागली होती. इतके झाले तरी बारीक लक्ष ठेवत काळजी घेणे गरजेचे होते.

परंतू असे काही झाले नाही दोन दिवसानंतर आज सिव्हील हॉस्पिटलच्या आय सी यू विभागाला आग लागून पाच पेशंट चा मृत्यु झाला आहे तर वीस जण गंभीर जखमी आहेत.

या सर्व प्रकाराला दोन दिवसांपूर्वी याच हॉस्पिटलच्या आवारात पार्कींग मध्ये गाडीला आग लागून सुध्दा व्यवस्थित चौकशी केली गेली

नसल्यामुळे सिव्हील सर्जन डॉ पोखरणांच्या हलगर्जपणामुळे हा प्रकार झाला असुन सर्वस्वी सिव्हील सर्जन डॉक्टर पोखरणा हेच जबाबदार आहेत

त्यामुळे त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक या पदावरून बडतर्फ करावे. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी मनसेच्या नितीन भुतारे यांनी गृहमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांना मेल द्वारे निवेदन पाठवुन केली आहे.

तसेच झोपलेल्या पालकमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे