file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- राहाता येथील बागडे वस्तीवरून एक शिक्षक काही एक न सांगता घरातून बेपत्ता झाले आहेत. तानाजी छबुराव गमे असे या शिक्षकाचे नाव असून याप्रकरणी त्यांच्या पत्नी प्रतिभा तानाजी गमे यांनी या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात हरवल्याची खबर दिली आहे.

दरम्यान राहाता पोलिसांनी याबाबत मिसींग केस दाखल केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रतिभा गमे यांचे पती दि. 21 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजणेच्या पुर्वी राहात्या घरातून कोणासही काहीही न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत.

बेपत्ता तानाजी गमे हे 45 वर्ष वयाचे आहेत. त्यांची उंची 5 फूट 5 इंच, रंग गहू वर्ण, शरिराने सडपातळ, उजव्या डोळ्याचे खाली पडल्यामुळे जखम झालेली आहे.

अंगात राखाडी रंगाचा शर्ट व काळे रंगाची पँट, पायात चप्पल, डोळ्याला चष्मा लावलेला आहे. तरी सदर व्यक्ती कुणास आढळल्यास राहाता पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस नाईक एस. बी. आवारे यांनी केले आहे.