अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार अरुणकाका जगताप यांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करुन गुरुपूजन करण्यात आले.

त्यांच्याप्रती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुस्थानी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप,

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर,

अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे,

उपाध्यक्ष अमोल कांडेकर, अ‍ॅड. राजेश कातोरे, राहुल ठोंबरे, दादा दरेकर, निलेश बांगरे, लकी खुबचंदानी, निलेश इंगळे, माऊली जाधव, राहुल बोरुडे,

जितेंद्र गायकवाड, संजय सत्रे, जितू गायकवाड आदी उपस्थित होते. प्रा. माणिक विधाते म्हणाले की, भारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान महत्त्वाचे आहे.

अंधकारमय जीवनात गुरु प्रकाशाची वाट दाखवित असतात. आमदार अरुणकाका जगताप यांनी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी घडविले.

राजकारण करताना त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला गुरु प्रमाणे मार्गदर्शन करुन त्यांच्या जीवनाला योग्य दिशा दिली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संग्राम जगताप विकासात्मक कामे करुन शहराचे रुप बदलत असल्याचे त्यांनी सांगितले.