अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   प्रतिशिर्डी म्हणून पूज्य असलेले प्रवरातीरावरील साई मंदिरात यंदा कोरोना पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमा उत्सव नियम पाळत साधेपणाने व उत्साहात साजरी झाली.

मंदिर स्थापनेच्या ३३ वर्षांपासून अखंडितपणे साईसच्चरित्र पोथीचे पारायण व गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात साजरा होतो. गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

मात्र यंदा कोरोनामुळे उत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला.आठवडाभरापासून साईबाबांच्या साईसच्चरित्र पोथीचे पारायण बसले होते.

परंपरेत खंड पडू नये, यासाठी ३ भक्तांनी पारायण केले. भक्तांना घरीच पोथीचे पारायण करण्याचे आवाहन मंदिर व्यवस्थेने केले होते. शुक्रवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायणाची सांगता झाली.