Health Tips :- शरीराच्या उत्तम आरोग्या करिता संतुलित आहार गरजेचा आहे व या संतुलित आहारामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारची भाजीपाला, तसेच डाळी, तृणधान्य आणि फळांचा समावेश करणे गरजेचे असते.
कारण शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी विविध प्रकारचे जीवनसत्वे आणि पोषक घटकांची गरज असते व यांची पूर्तता संतुलित आहाराच्या माध्यमातून होते. याव्यतिरिक्त इतर असे अनेक खाद्यपदार्थ आहेत की ज्यांच्या सेवनाने देखील आरोग्याला खूप मोठा फायदा मिळतो.
त्यापैकीच एक आहे मेथीचे दाणे हे होय. साधारणपणे भाजीपाल्यामध्ये मेथी आरोग्यासाठी खूप फायद्याची मानली जाते. परंतु या व्यतिरिक्त मेथीचे दाणे देखील आरोग्यासाठी खूप फायद्याचे मानतात. मेथीचे दाणे हे अनेक पोषक तत्त्वांचा समृद्ध स्त्रोत असून त्यामध्ये सोडियम,
पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि सी इत्यादी घटक असल्यामुळे 14 दिवसांपर्यंत मेथीचे दाणे खाल्ले तर शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण मेथीच्या दाण्यांचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिळणारे फायदे बघू.
14 दिवस मेथीचे दाणे खाल्ल्याने मिळतात हे फायदे
1- मेथीचे दाणे खाल्ल्यामुळे शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर ती दूर होते.
2- तसेच मेथीमध्ये विरघळणारे फायबर असल्यामुळे त्या माध्यमातून कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे शोषण कमी करून रक्तातील साखरेचे पातळी नियंत्रित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पडते. त्यामुळे मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांकरिता हे खूप फायद्याचे आहे.
3- तसेच आतड्यांमधील जे काही कोलेस्ट्रॉलचे शोषण होते ते रोखण्यासाठी मेथी मदत करते व त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
4- तसेच मेथीच्या दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर त्यापासून मुक्तता मिळते व पोटात होणारी जळजळ देखील कमी होते.
5- यामध्ये फायबर, लोह, प्रथिने इत्यादी पोषक घटक जास्त प्रमाणात असल्यामुळे खूप मोठा फायदा होतो. जसे की पचनास मदत करणे, रक्तामध्ये साखर नियंत्रणात ठेवणे, वजन कमी करायला प्रोत्साहन देणे व कोलेस्ट्रॉल कमी करणे यासाठी देखील ते फायद्याचे आहे.
6- मेथीच्या दाण्यांमध्ये उच्च फायबर सामग्री असल्यामुळे आतड्यांच्या हालचालीचे योग्य नियमन करण्यास मदत होते व आतड्यांचे आरोग्य सुधारते.
7- तसेच यामुळे रक्तातील साखरेचे पातळी कमी व्हायला मदत होते त्यामुळे ज्यांना आधीच डायबिटीस आहे किंवा तो होण्याचा धोका आहे अशा लोकांसाठी ते विशेष फायद्याचे ठरते.
मेथीच्या दाण्यांचे सेवन कसे करावे?
याकरिता सगळ्यात आधी तुम्हाला एक चमचा मेथी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणे गरजेचे आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी भिजत घातलेल्या दाण्याचे सेवन करावे.
परंतु हे लक्षात ठेवावे
एखाद्या वेळेस मेथीच्या दाण्यांवरील जी काही प्रतिक्रिया येते ती व्यक्तीनुसार वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. त्यामुळे काही लोकांना अतिसार किंवा काही एलर्जीक प्रतिक्रियांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात. जर अशा व्यक्तींनी जास्त प्रमाणामध्ये मेथीचे दाणे खाल्ले तर अतिसार, चक्कर किंवा मळमळ, डोकेदुखी सारखी समस्या उद्भवू शकते.
(टीप- कुठलाही उपचार करण्याअगोदर आणि आहारात बदल करण्याअगोदर वैद्यकीय तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)