Health Information: पाणी आहे शरीरासाठी फायद्याचे! तुमच्या वजनानुसार रोज किती प्याल पाणी? वाचा महत्त्वाची माहिती

Ajay Patil
Published:
drinking water

Health Information:- पाण्याला जीवन असे म्हटले जाते. सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पाणी खूप आवश्यक आहे. ज्याप्रमाणे मानवाला जगण्यासाठी आहाराची आवश्यकता असते अगदी त्यापेक्षा जास्त आवश्यकता ही पाण्याचे असते.कारण मानवाचे शरीर जवळपास 70 टक्के पाण्याने बनलेले आहे.

शरीरातील पेशींना पोषण पुरवणे आणि तापमान नियंत्रित करण्यामध्ये पाण्याची भूमिका अनन्यसाधारण आहे. आपण जे काही अन्न खातो त्याचे विघटन करण्यासाठी आणि त्यातून मिळालेले पोषक द्रव्य शोषण्यासाठी पाण्याची गरज असते. तसेच बद्धकोष्ठतेसारख्या अनेक शारीरिक समस्या दूर ठेवण्यासाठी देखील पाण्याची मदत होते.

त्वचेच्या आरोग्याकरिता देखील पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शरीरात जे काही टाकाऊ आणि विषारी पदार्थ तयार होत असतात ते शरीराच्या बाहेर टाकण्याकरिता देखील पाणी किडनीला  मोठ्या प्रमाणावर सहाय्य करत असते.

त्यामुळे पाणी हे खूप महत्त्वाचे असून शरीराला आवश्यक पाणी दररोज पिणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण किती वजनाच्या व्यक्तीने किती पाणी दररोज प्यावे आणि पाणी पिण्याचा टाइमिंग कोणता असावा किंवा केव्हा पाणी प्यावे? इत्यादी बद्दल माहिती घेणार आहोत.

 पाणी पिण्याचे फायदे

ज्याप्रमाणे आपण पाहिले की पाणी पिण्याचे जे फायदे होतात त्यापेक्षा अधिकचे फायदे देखील शरीराला होत असतात. मुतखडा अर्थात किडनी स्टोनचा धोका देखील पाण्यामुळे कमी होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीरावरून नियंत्रण ठेवणारा मेंदू या अवयवाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी देखील पाणी उपयुक्त आहे.

कारण तुमचा 73 टक्के भाग हा पाण्याने बनलेला असतो. अशा परिस्थितीत जर कमी पाणी प्यायले व त्यामुळे डीहायड्रेशन झाले तर त्याचा विपरीत परिणाम मेंदूच्या कार्यावर होतो व मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकतो. त्यामुळे डोकेदुखी सारखा त्रास संभवतो. पुरेशा प्रमाणामध्ये दररोज पाणी पिण्याने  मनाची एकाग्रता वाढायला मदत होते.

यामध्ये जर पाहिले तर व्यक्तीने दररोज किती पाणी प्यायला हवे हे सर्वस्वी व्यक्तीचे वजन,त्याचे वय तसेच लिंग,व्यक्ती किती सक्रिय आहे यावर आणि हवामानावर देखील हे अवलंबून असते.

 व्यक्तीने वजनानुसार रोज किती पाणी प्यावे?

जर आपण यामध्ये पाहिले तर एका निरोगी प्रौढ व्यक्तीला शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्राम दररोज सुमारे 35 मिली पाणी पिणे गरजेचे आहे व त्यानुसार पाहिले तर…

1- 50 किलो वजन असलेल्या व्यक्तीने प्रत्येक दिवसाला सुमारे 1.7 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

2- 60 किलो वजन असलेल्या व्यक्तीने दररोज सुमारे 2.1 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

3- 70 किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज सुमारे 2.4 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

4- ८० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज 2.8 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

तसेच यामध्ये जे लोक शारीरिक कष्ट करतात किंवा एखाद्या उष्ण भागामध्ये राहतात अशा ठिकाणी किंवा अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर घाम येतो व अशा घामाच्या माध्यमातून शरीरातील द्रव्य गमावले जाते व त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकतो.

अशा परिस्थितीमध्ये शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असू शकते. म्हणून शरीर हायड्रेट ठेवण्याकरिता पाण्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे असते. त्यामुळे शरीराची तहान लक्षात घेता योग्य वेळी पाणी पिणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe