Health Tips: जास्त प्रमाणात पाणी पिणे देखील असते आरोग्याला अपायकारक! वैद्यकीय तज्ञांनी दिला इशारा, वाचा कोणी सरासरी किती प्यावे पाणी?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips:- सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या कालावधीत उष्णता असते व यामुळे परत परत तहान लागते. तसेच घाम देखील मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे डीहायड्रेशन होऊ नये यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण या कालावधीत नक्कीच वाढते.

परंतु कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात झाली तर तिचा फायदा होण्याऐवजी नुकसान अधिक होते असे म्हटले जाते व हा मुद्दा पाण्याच्या बाबतीत देखील लागू होतो. शरीराला उन्हाळ्यात डीहायड्रेशनचा धोका उद्भवू नये म्हणून गरजेनुसार पाणी पिणे गरजेचे आहे.

म्हणून शरीर हायड्रेट राहावे म्हणून नको त्या प्रमाणात पाणी पिणे देखील चांगले नाही. जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायला तर फायदा होण्याऐवजी तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते. याबाबत वैद्यकीय तज्ञांनी एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे व त्यासंबंधीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 जास्तीचे पाणी पिणे देखील असते आरोग्याला घातक

सध्या उन्हाळा सुरू असून उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशन होऊ नये म्हणून गरजेनुसार पाणी पिणे खूप गरजेचे असते. परंतु उन्हाळा आहे म्हणून शरीर हायड्रेट ठेवण्याकरिता दिवसभर किती पाणी पिणे देखील शरीराला अपायकारक आहे. अशा पद्धतीने जर कितीही पाणी प्यायले तर ओव्हर हायड्रेशनचा त्रास होऊ शकतो असा इशारा वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.

पाणी हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे असून पुरेसे पाणी पिले तर शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते आणि जे काही विषारी पदार्थ असतात ते बाहेर टाकायला देखील मदत होते. परंतु जास्त प्रमाणात पाणी पिणे हे देखील योग्य नाही. पाण्याचे अतिसेवन केले तर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

जर आपण नॉर्मल व्यक्तीचा विचार केला तर असे व्यक्ती आवश्यकतेनुसार पाणी पितो. परंतु जर कोणाला किडनीचा काही आजार किंवा मेंदूचा आजार असेल तर अशा रुग्णांनी कमी पाणी पिणे आवश्यक असते. जर शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो व अशाप्रकारे ओव्हर हायड्रेशनचा थेट परिणाम किडनीवर पडतो.

याबाबत तज्ञ म्हणतात की शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी गरजेनुसार पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. परंतु दिवसभर उठसुट पाणी पीत बसू नये. जास्त पाणी पिले तर रक्तातील सोडियमसह इतर इलेक्ट्रोलाईट्स पातळ होतात व त्यामुळे स्नायूंमध्ये वेदना जाणवणे किंवा स्नायूंमध्ये पेटका म्हणजेच क्रॅम्प इत्यादी त्रास होऊ शकतो.

तसेच तज्ञांच्या मते निरोगी शरीरा करीता एका दिवसातून अडीच ते साडेतीन लिटर दरम्यान पाणी पिणे पुरेसे आहे. तसेच जर कुणाला हृदय, मेंदू आणि किडनीशी संबंधित आजार असतील तर अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार पाणी प्यावे.

 कमी पाणी प्यायला तरी होतो त्रास

जर व्यक्तीने शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायले तर त्याला डोके दुखणे, चक्कर येणे, डिहायड्रेशन, लघवीचे प्रमाण कमी होणे, ओठ व त्वचा कोरडी पडणे, रक्तदाब कमी होण्याची शक्यता असणे तसेच बद्धकोष्ठता इत्यादी लक्षणे दिसून येतात.

 कोणत्या वयोगटातील व्यक्तीने दिवसाला सरासरी किती पाणी प्यावे?

1- शून्य ते सहा महिने वयोगटपाण्याची आवश्यकता नाही.

2- सहा महिने ते एक वर्ष दोनशे मिली पाणी प्यावे.

3- एक वर्ष ते तीन वर्ष दिवसाला एक लिटर पाणी प्यावे.

4- चार वर्ष ते आठ वर्ष दिवसाला 1.2 लिटर पाणी प्यावे.

5- नऊ वर्ष ते तेरा वर्ष दिवसाला 1.8 लिटर पाणी प्यावे.

6- 14 वर्षे ते अठरा वर्ष दिवसाला अडीच लिटर पाणी प्यावे.

7- 18 वर्षावरील वयोगट दिवसाला अडीच ते साडेतीन लिटर पाणी प्यावे.