Health Tips: हे फूड एकत्रित खा आणि तब्येत ठेवा ठणठणीत! आयुष्य राहील निरोगी, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips:- आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण घेत असलेल्या आहाराला खूप महत्त्व असते. आहार घेत असताना तो संतुलित आणि पौष्टिक घटकांनी समृद्ध असला तर शरीरासाठी ते खूप महत्त्वाचे असते. जर आपण भारतीय आहार पाहिला तर भाजी पोळी, भाजीपाला, वेगवेगळ्या प्रकारची फळे तसेच मांसाहार याचा प्रामुख्याने आहारातील समावेश केला जातो.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून  संतुलित आहार मानवी शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे व त्यासोबतच चांगल्या आरोग्याकरिता काही घटकांचे एकत्रीकरण करून सेवन करणे म्हणजेच फूड कॉम्बिनेशन घेणे देखील उत्तम आरोग्यासाठी फायद्याचे आहे. अशा फूड कॉम्बिनेशन बद्दल काही तज्ञांनी दिलेली महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे फूड कॉम्बिनेशन

1- टोमॅटो आणि ऑलिव्ह ऑइल टोमॅटो हे एक महत्वपूर्ण भाजीपाला पिक असून आहारामध्ये टोमॅटोचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे फोयटो केमिकल असते व त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका खूप कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर प्रोस्टेट आरोग्यामध्ये सुधारणा करून हृदय रोगाचा जो काही संभाव्य धोका असतो तो टाळण्यास मदत होते. यामध्ये केरोटीनॉड्स असल्यामुळे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून जर खाल्ले तर याचे दुप्पट पद्धतीने फायदे मिळतात.

2- दही आणि भात जर तुम्ही दही आणि भात सोबत खाल्ला तर मायक्रोबायल संतुलन चांगले ठेवण्यासाठी मदत होते. हे कॉम्बिनेशन प्रोबायोटिकचा एक उत्तम आणि समृद्ध स्त्रोत आहे. दही खाल्ल्यामुळे पोटाचा त्रास कमी होतो व भातातील फायबर्स यामध्ये ऍड झाल्यामुळे पचनाचे विकार उद्भवत नाहीत. तसेच यामध्ये अँटिऑक्सिडंट असल्यामुळे शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते व शरीराला चांगल्या पद्धतीने ऊर्जा मिळते.

3- लिंबू आणि पालक हे कॉम्बिनेशन देखील शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता फायदेशीर आहे. पालक मध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असते व लिंबातील विटामिन सी शरीराला आयर्न शोषण याकरिता मदत करते. म्हणून तुम्ही जेव्हा पालकाचे सूप किंवा भाजी बनवतात तेव्हा लिंबाचा आहारामध्ये समावेश करावा. यामुळे नक्कीच फायदा मिळतो.

4- खजूर आणि दूध जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर थकवा येत असेल किंवा जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर तुम्ही खजूर आणि दूध मिक्स करून त्याचे सेवन करू शकतात. या कॉम्बिनेशन मुळे वजन कमी असेल तर वाढण्यास मदत होते व हाड देखील बळकट होतात. याशिवाय रक्ताची कमतरता देखील भरून निघते व रक्तभिसरण व्यवस्थित होते.

5- टरबूज आणि गूळ किंवा साखर टरबूज खात असताना त्यासोबत जर तुम्ही गोड किंवा साखर खाल्ली तर आतड्यांच्या उत्तम आरोग्या करीता हे कॉम्बिनेशन खूप गरजेचे आहे. तसेच या कॉम्बिनेशन शिवाय तुम्ही केळी सोबत वेलची या फूड कॉम्बिनेशन चा देखील आहारात समावेश करू शकतात.

अशा पद्धतीने तुम्ही या काही फूड कॉम्बिनेशन च्या मदतीने तुमचे शरीर आणि आरोग्य उत्तम ठेवू शकता.