शरीराच्या चांगल्या आरोग्याकरिता आणि सुदृढ शरीरासाठी संतुलित आहार गरजेचा असतो व यामध्ये अनेक प्रकारच्या भाजीपाला पिकांपासून तर मांसाहारी पदार्थांचा समावेश केला जातो व त्यासोबतच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ व वेगवेगळ्या फळांचा देखील वापर आपण आहारात करत असतो.
शरीराच्या संतुलित विकासाकरिता आवश्यक असलेल्या पोषक घटकांची पूर्तता अशा संतुलित आहाराच्या माध्यमातून होत असते. याच पद्धतीने जर आपण शेवग्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर शेवग्याच्या शेंगाच नाही तर त्याचे मूळ तसेच पान व फळे व फुले देखील पोषक तत्त्वांनी समृद्ध आहेत व निसर्गामध्ये असे कुठलेही झाड नाही.
सुपरफूड म्हणून देखील ओळखले जाते. पोषण तज्ञांच्या मते 300 पेक्षा अधिक किरकोळ आणि मोठ्या आजारांवर शेवगा उपयुक्त आहे. या लेखांमध्ये शेवगा खाल्ल्याने आरोग्याला कुठले फायदे मिळतात? याविषयीची माहिती आपण बघू.
शेवगा किती आहे आरोग्यासाठी फायदेशीर?
1- अँटिऑक्सिडटने समृद्ध– शेवग्यामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात व ही संयुगे शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून टाकायला मदत करतात. जर शरीरामध्ये अशा फ्री रॅडिकल्स मध्ये वाढ झाली तर ऑक्सीडेटिव्ह तणाव वाढतो
याच कारणामुळे टाईप 2 मधुमेह आणि हृदयरोग यासारख्या समस्या निर्माण होतात. तसेच शेवग्यामध्ये क्वेर्सीटिन नावाचे पावरफुल असे अँटिऑक्सिडेंट असते व त्यामुळे रक्तातील साखरेचे पातळी देखील नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. शेवगा खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका देखील कमी होतो.
2- हाडांच्या आरोग्यासाठी फायद्याचा– शेवग्यामध्ये कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस ही तीन आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. लहान मुलांच्या आहारामध्ये जर शेवग्याच्या समावेश केला तर त्यांची वाढ आणि विकास चांगला होतो. हाडांचे घनता वाढून हाडे जाड व मजबूत होतात व म्हातारपणामध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
3- रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायद्याचा– शेवग्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात व त्यामुळे आहारात जर समावेश केला तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते तसेच सर्दी खोकला यासारखे संसर्ग लवकर होत नाही.एवढेच नाही तर दमा, खोकला किंवा कोणत्याही प्रकारच्या श्वसनाशी संबंधित संसर्गाच्या विरोधात लढण्यासाठी मदत होते.
4- आतड्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचा– शेवग्यामध्ये थायामीन म्हणजेच विटामिन बी 1, रेबोप्लेविन म्हणजे विटामिन बी दोन, नीयासीन आणि व्हिटॅमिन बी 12 सारखे आवश्यक जीवनसत्व असतात. जे पाचक रसांचे स्त्राव उत्तेजित करण्यास मदत करतात. हे कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि चरबी तोडण्यास आणि त्यांना पचवण्या योग्य स्वरूपात रूपांतरित करण्यास देखील मदत करतात. तसेच शेवगा हा फायबर समृद्ध असल्याने आतड्यातील मायक्रोबायोमसाठी देखील ते चांगले आहे व शेवगा खाल्ल्याने यामुळे पोट साफ राहते.
5- ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण सुधारते– शेवग्यामध्ये नियाझिमीनिन आणि आयसोथीओसायनेट ही बायो एक्टिव संयुगे आढळून येतात व यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात व उच्च रक्तदाबाचा धोका देखील टळतो. तसेच यामध्ये अँटिऑक्सिडंट जास्त असल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते.
6- किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर– शेवग्यामध्ये अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात व त्यामुळे किडनीतून विषारी पदार्थ काढून टाकायला मदत होते. जर शेवग्याचा आहारामध्ये नियमितपणे समावेश केला तर किडनी आणि किडनीच्या संबंधातील स्टोनवर उपचार करण्यास मदत मिळते. शेवग्याच्या सेवनाने किडनीचे आरोग्य सुधारते.
7- कॅन्सरचा धोका कमी होतो– आहारामध्ये शेवग्याचा नियमित समावेश केल्याने भरपूर अँटिऑक्सिडेंट मिळतात. विटामिन ए, विटामिन सी तसेच बीटा कॅरोटीन आणि नियाझीमायसीन इत्यादीचे भरपूर प्रमाण असल्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध होतो. या प्रकारची अँटिऑक्सिडंट फ्री रॅडिकल्स कमी करून ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून पेशींचे संरक्षण करतात.
8- लिव्हर म्हणजेच यकृताच्या उत्तम आरोग्यासाठी फायद्याचा– आपल्याला माहित आहे की शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव हा यकृत असून जवळपास शरीरातील 500 लहान-मोठे कामे यकृताच्या माध्यमातून पार पाडतात. यातील सगळ्यात महत्त्वाची कामे म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे हे होय.
यकृताच्या या कार्यात शेवगा खूप उपयुक्त ठरतो. बऱ्याचदा काही औषधांमुळे यकृताचे संभाव्य नुकसान होऊ शकते. अशावेळी जर तुम्ही शेवग्याचा आहारात वापर करत असाल तर असे संभाव्य नुकसानीपासून संरक्षण मिळते. म्हणजेच एक प्रकारे शेवगा हा यकृतासाठी सुरक्षा कवच म्हणून काम करतो.