Health Benefit Of Papaya: सकाळी उठा आणि उपाशीपोटी पपई खा! ऍसिडिटी तर पडेल दूर पण वजन देखील राहील नियंत्रणात, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Benefit Of Papaya:- संतुलित आहार आणि शरीराचे आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणजेच शरीराला आवश्यक असणारे जे काही पोषक घटक असतात ते आहारातून मानवाच्या शरीराला मिळत असतात. तेव्हाच शरीराची सगळी कार्य ही व्यवस्थित आणि संतुलित पद्धतीने चालतात. त्यामुळे संतुलित आहार खूप महत्त्वाचा असतो.

यामध्ये अनेक प्रकारच्या फळांचा वापर केला जातो आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे फळांचे सेवन हे खूप फायदेशीर आहे. कारण फळांमध्ये असलेले अनेक जीवनसत्वे तसेच इतर पोषक घटकांमुळे शरीराचे पोषण योग्य रीतीने होते व त्याचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक फायदे होतात.

त्यामध्ये जर आपण पपई या फळाचा विचार केला तर हे एक  स्वादिष्ट फळ तर आहेच परंतु शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता ते तितकेच महत्त्वाचे आहे. कारण पपईमध्ये जे पपेन नावाचे एंजाइम असते ते पचनक्रिया व्यवस्थित ठेवायला मदत करते. याशिवाय अनेक प्रकारचे जीवनसत्वे आणि खनिजांचा समृद्ध साठा पपई मध्ये असल्यामुळे पपईचे सेवन शरीरासाठी फायद्याचे आहे. त्यातल्या त्यात जर उपाशी पोटी पपई खाल्ली तर अनेक प्रकारचे फायदे शरीराला मिळतात.

 सकाळी उपाशीपोटी पपई खाण्याचे फायदे

1- ऍसिडिटी पासून आराम सध्या अनेक लहान मुलांना देखील ऍसिडिटीचा त्रास आपल्याला दिसून येतो. काही जणांना तर वारंवार हा त्रास होत असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी जर पपई खाल्ली तर ऍसिडिटी पासून आराम मिळू शकतो. पपई खाल्ल्यामुळे हायपर ऍसिडिटी सुद्धा कमी होण्यास मदत होते.

2- पचनक्रियेत सुधारणा पपईमध्ये पपेन नावाचे एझाईम असते व यामुळे जेवण करण्याअगोदर जर पपई खाल्ली तर खूप मोठा फायदा होतो. कारण हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. म्हणजे शरीरातील जे काही टाकाऊ पदार्थ असतात ते काढण्याला मदत करते. तसेच यामुळे पचनक्रिया सुधारते व आतड्यांचे आरोग्य देखील उत्तम राहते. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो तो दूर होतो.

3- वजन राहते नियंत्रणात तसेच पपई मध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्यास पपई मदत करते. उपाशीपोटी पपई खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते व इन्सुलिनची मात्र सुद्धा सुधारते. ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते.

4- अँटिऑक्सिडंट म्हणून फायदा पपई मध्ये मायरीसेटिन, कॅफिक ऍसिड आणि विटामिन सी, ए आणि ई सारखे अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात व यामुळे शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवणारे जे काही घटक असतात त्यासोबत अँटिऑक्सिडंट लढतात व आपल्या आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.

त्यामुळे उपाशीपोटी पपईचे सेवन करणे खूप फायद्याचे आहे व जर सकाळी नाष्टा मध्ये तुम्हाला पोषक आहार घ्यायचा असेल तर तुम्ही पपई या पर्यायाचा विचार करू शकता.