Health Tips:- उत्तम आरोग्याकरिता आपल्याला संतुलित आहार घेणे गरजेचे असते हे आपल्याला माहित आहे. उत्तम आरोग्य करीता शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते व अशा पोषक घटकांची पूर्तता हे संतुलित आहाराच्या माध्यमातूनच होत असते. याकरिता आहारामध्ये हिरवा भाजीपाला, मटन, मासे तसेच अंडे व इतर फळांचा देखील समावेश केला जातो.
परंतु या व्यतिरिक्त असे अनेक पदार्थ आहेत की ज्या खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो व आरोग्य देखील सुदृढ राहते. त्यामध्ये जर आपण गुळ आणि शेंगदाण्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर गूळ शेंगदाणे जर नियमितपणे खाल्ले तर शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात.
गुळ शेंगदाणे खा आणि रहा फिट
शेंगदाण्यांमध्ये पौष्टिकता गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतो व यामध्ये स्निग्धता देखील असल्यामुळे पोटाच्या तक्रारींवर याचा खूप मोठा फायदा मिळतो. जर तुम्ही नियमितपणे सेवन केले तर ऍसिडिटी तसेच गॅसच्या समस्या पासून सुटका मिळण्यास मदत होते. महिलांनी जर गुळ आणि शेंगदाणे खाल्ले तर हिमोग्लोबिन वाढते.
ओला खोकल्याची समस्या असेल तर त्यावर शेंगदाण्याचा खूप मोठा फायदा मिळतो. शेंगदाणा खाल्ल्याने पचनशक्ती वाढते व भूक न लागण्याची समस्या देखील दूर होण्यास मदत होते. गर्भवती स्त्रियांनी देखील या कालावधीत शेंगदाण्याचे नियमितपणे सेवन करणे चांगले ठरते.
तसेच शेंगदाण्यांमध्ये ओमेगा फॅट जास्त असल्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण फायदा होतो. तसेच शेंगदाण्यामुळे कोलेस्ट्रॉल नियमित राहण्यामध्ये देखील मदत होते. तसेच शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त असते व त्यामुळे हाडे देखील मजबूत होतात.
दररोज जर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये शेंगदाण्यांचे सेवन केले तर महिला आणि पुरुषांमध्ये हार्मोन्सचे संतुलन कायम ठेवता येते. दररोज जर 50 ते 100 ग्राम शेंगदाणे खाल्ले तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते व खाल्लेले अन्न देखील पचायला मदत होते. तसेच शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत नाही व कोलेस्ट्रॉल देखील कंट्रोलमध्ये राहते. बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेक धोके संभवतात व याकरिता गुळ शेंगदाणे खाणे फायद्याचे ठरते.
रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिक पद्धतीने वाढवण्यासाठी चा सोपा उपाय
बऱ्याच लोकांना रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी खालवण्याची समस्या उद्भवते. अशावेळी जर तुम्हाला रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिकरीत्या वाढवायची असेल तर त्याकरिता लोहयुक्त आहार घेणे गरजेचे आहे.
यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढते. याकरिता आहारामध्ये मटण, मासे, सोयाबीन, टोफू, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, गाजर आणि बीट अशा पदार्थांचा समावेश करून तुम्ही आहारातील लोहाचे प्रमाण वाढवू शकतात.