Health Tips:- शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहार घेणे खूप गरजेचे असते. कारण शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आपल्याला संतुलित आहाराच्या माध्यमातूनच मिळत असतात. परंतु आपण जे काही खातो किंवा पितो त्याचा काही टाइमिंग असणे देखील खूप महत्त्वाचे असते.
कोणत्याही वेळी कोणताही पदार्थ खाणे हे देखील शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. त्याकरिता आहार घेताना किंवा कुठलीही गोष्ट खाताना किंवा पिताना आपल्याला काही नियम पाळणे खूप गरजेचे असते. बऱ्याचदा आपल्यापैकी काही जणांना सवय असते की जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा रिकाम्या पोटी भूक लागल्यामुळे काहीतरी पदार्थ खात असतो.
परंतु बऱ्याचदा असे काही पदार्थ किंवा पेय आहेत की जे तुम्ही सकाळी खाल्ले किंवा पिले तर शरीराला फायदा होण्याऐवजी त्यापासून नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाऊ नयेत या विषयावर तज्ञांनी काही माहिती दिली आहे ते आपण बघू.
सकाळी उपाशीपोटी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ
1- तळलेले पदार्थ– सकाळी उठल्यावर तळलेले पदार्थ खाणे म्हणजे शारीरिक त्रासाला निमंत्रण देण्यासारखेच आहे. यामध्ये जर सकाळी उठल्यानंतर तुम्ही तळलेले पदार्थ खाल्ले तर तुमची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तसेच दिवसभर तुम्हाला पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी तळलेले पदार्थ कधीच खाऊ नये.
2- मसालेदार पदार्थांचे सेवन– अनेक जणांना मसालेदार किंवा चटपटीत खाणे आवडते. परंतु सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी मसालेदार पदार्थ कधीच खाऊ नये. त्यामुळे देखील पोटाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
3- चहा– सकाळी उठल्याबरोबर ब्रश केला की लगेच चहा प्यायची सवय ही प्रत्येकालाच असते. परंतु चहा ऍसिडिक असल्यामुळे रिकाम्या पोटी जर चहा पिला तर शरीराचा ऍसिडिक समतोल बिघडतो तुम्हाला ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. तसेच साखरेचा चहा जर सकाळी प्यायला तर साखरेचे पातळी वाढते व अनेक आवश्यक पोषक द्रव्य मिळत नाहीत. त्यामुळे उपाशीपोटी चहा कदापि पिऊ नये.
4- कॉफी– बऱ्याच जणांना सकाळी उठल्यावर कॉफी पिण्याची सवय असते. आता तर सकाळीच नाही तर केव्हाही कॉपी केली जाते. परंतु जर तुम्ही सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कॉफी पिली तर अपचन आणि पोटाचा त्रास होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पचनक्रियेत बिघाड होतो व अपचनामुळे अनेक इतर शारीरिक समस्यांना सुरुवात होते.
5- कोल्ड्रिंक– सकाळची सुरुवात कधीही कोल्ड्रिंक्स ने करू नये. सकाळी सकाळी जर तुम्ही उपाशीपोटी कोल्ड्रिंक्स घेतले तर पोटाला त्रास होऊन पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो.सकाळी उठल्यानंतर लगेच फ्रीजमधील पाणी पिऊ नये. असं जर केले तर आरोग्याला नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच असे फ्रिजमधील पाणी जर पिले तर पचनक्रियेवर देखील विपरीत परिणाम होतो व यामुळे पोटासंबंधीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.