बाजारातून लाल टरबूज खरेदी करत आहात, परंतु ते नॅचरल पिकलेले आहे की केमिकलने? कसे ओळखाल? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
watermelon

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे सगळीकडे प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे या कालावधीत गारवा मिळावा याकरिता विविध फळांचे ज्यूस, टरबूज आणि द्राक्षांसारखी फळे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जातात.

त्यातल्या त्यात टरबूजचा वापर उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण रसाळ व गोड असलेले टरबूज उन्हाळ्यामध्ये खाणे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील फायदेशीर असते व  एकंदरीत मनाला गारवा देण्याच्या दृष्टिकोनातून देखील टरबूज फायद्याचे ठरते.

तसेच अशा कालावधीत गोड टरबूज खाण्याची मजा काही औरच असते. परंतु टरबूज घेताना ते लाल असते. परंतु ते नॅचरल पद्धतीने पिकवले आहे की केमिकलने? हे ओळखता येणे खूप गरजेचे आहे. कारण सध्या बाजारात इंजेक्शन टोचलेले व त्या माध्यमातून पिकवलेले टरबूज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

अशा प्रकारचे टरबूज जर खाल्ली तर ते शरीरासाठी नुकसान देणारे ठरू शकते. त्यामुळे बाजारातून घेतलेले टरबूज खाण्यापूर्वी ते तपासून घेणे गरजेचे आहे व त्याकरिता तुम्हाला कापसाचा बोळा मदत करू शकतो. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात बघू.

 ही पद्धत वापरा आणि टरबूज नॅचरल पिकलेले आहे की केमिकलने हे ओळखा

सध्या मोठ्या प्रमाणावर टरबुजाचा हंगाम सुरू असून उन्हाळ्यामध्ये प्रत्येक जण टरबूज मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील टरबूज खाणे खूप फायद्याचे आहे. परंतु लालेलाल दिसणारे टरबूज हे खरंच नॅचरल  म्हणजेच नैसर्गिकरीतीने पिकलेली आहे की इंजेक्शन देऊन पिकवलेली आहे हे तपासणे खूप गरजेचे आहे.

इंजेक्शन देऊन म्हणजेच केमिकलने टरबूज पिकवलेले असले तर ते दिसायला लाल असते परंतु गोड लागत नाही व त्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात.

याकरिता एफएसएसएआयने सांगितले आहे की, टरबुजाच्या आत एरिथ्रोसीन हे रसायन टोचले जाते व हा एक प्रकारचा लाल रंग असतो व मिठाई इत्यादी मध्ये वापरला जातो. सरकारने हा धोकादायक रंग खाद्यपदार्थांमध्ये मिसळण्यास मनाई केलेली आहे.

 गोड नॅचरल टरबुजाची ओळख करण्यासाठी करा ही चाचणी

याबद्दल माहिती देताना FSSAI ने सांगितले आहे की याकरिता टरबुजाचे दोन समान भाग करावे. यातील एका भागावर कापसाचा छोटा बोळा तयार करावा व टरबुजाच्या लाल भागावर घासावा.

घासल्यानंतर जर कापसावर लाल रंग आला नसेल तर ते टरबूज पूर्णपणे नैसर्गिक पिकवलेले आहे असे समजावे. म्हणजेच ते आरोग्यासाठी चांगले असते व खायला देखील गोड असते. परंतु अशा पद्धतीने कापसाचा बोळा टरबूजावर सोडल्यानंतर जर त्याचा रंग लाल झाला तर ते केमिकल टाकून पिकवलेले आहे असे समजावे.

अशा प्रकारचे टरबूज हे आरोग्यासाठी हानिकारक असून त्यामुळे नुकसान होऊ शकते. अशा पद्धतीने रसायन टाकून पिकवलेले टरबूज खाल्यामुळे उलट्या, पोटदुखी तसेच जुलाब, मळमळ, भूक न लागणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. काही संशोधनाअंती असेच दिसून आले आहे की, जास्त कालावधीपर्यंत अशा पद्धतीने सेवन केले तर थायरॉईड होण्याचा धोका संभवतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe