‘या’ सोप्या ट्रिक वापरा आणि माठातले पाणी गारेगार करा! भागेल तहान आणि आरोग्याला होईल फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवतो. त्यामुळे जरा कुठे आपण बाहेर फिरून आलो तरी आपल्याला प्रचंड प्रमाणात तहान लागते व आपल्याला थंडगार पाणी प्यावेसे वाटते. याकरिता आपण बऱ्याचदा फ्रीजमधील पाण्याचा वापर करतो.

परंतु कित्येकजणांना या फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यामुळे  सर्दी खोकल्याचा त्रास होण्याचा संभव असतो. तसेच बऱ्याचदा ते आरोग्यासाठी हितकारक नसते. अशावेळी ‘जुनं ते सोनं’ त्या उक्तीप्रमाणे आज देखील बऱ्याच घरांमध्ये उन्हाळ्याच्या कालावधीत मातीच्या माठाचा थंड पाण्यासाठी वापर केला जातो.

अशाप्रकारे मातीच्या माठात पाणी प्यायले तर ते आरोग्यासाठी देखील फायद्याची ठरते. परंतु बऱ्याचदा घरामध्ये माठ असतो परंतु बाहेरील वातावरणामध्ये उकाडा प्रचंड असल्याने माठातील पाणी हवे तेवढे थंड होत नाही. अशावेळी तुम्हाला जर माठातील पाणी अगदी थंडगार करायचे असेल तर तुम्ही अगदी छोट्या टिप्स वापरून माठातील पाणी थंड करू शकतात.

 या सोप्या ट्रिक्स वापरा आणि माठातील पाणी थंड करा

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही उन्हाळ्याच्या कालावधीत घरासाठी माठ खरेदी करतात तेव्हा तो खरोखरच निव्वळ माती पासून बनवला आहे की नाही हे तपासून बघणे गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा बाजारामध्ये सिमेंटचे माठ येतात व वरून मातीचा मुलामा दिलेला असतो.

त्यामुळे असा माठ खरेदी न करता तो मातीचा बनवलेला माठ असणे गरजेचे आहे. याकरता तुम्ही हाताने किंवा चमच्याने माठ वाजवून तो तपासू शकता. फक्त माती पासून बनलेला माठ असेल तो तुम्हाला थंड पाणी पुरवू शकतो.

2- दुसरी ट्रिक्स म्हणजे घरामध्ये जेव्हा आपण ज्या स्टॅन्डवर मातीचा माठ ठेवतो त्या स्टैंड वर मातीचा माठ ठेवण्याअगोदर मातीची एक छोटीशी कुंडी ठेवावी. ही कुंडी संपूर्णपणे मातीने भरून घ्यावी

व येथील माती पाण्याने भिजवून ओली होईल इतके पाणी त्यामध्ये टाकावे. त्यानंतर या कुंडीवर पाण्याने भरलेला मातीचा माठ अलगद ठेवावा. या ट्रिक्सने माठातील पाणी थंडगार होते.

3- तिसरी ट्रिक्स म्हणजे जेव्हा तुम्ही मातीचा माठ पाण्याने भरतात तेव्हा त्या माठा सभोवती एक कॉटनचा टॉवेल किंवा सुती कापड घेऊन तो पाण्याने भिजवून घ्यावा व हा भिजवलेला कापड माठाच्या बाहेरील बाजूने गुंडाळून घ्यावा. असं केल्यामुळे माठातील पाणी जास्त कालावधी करिता थंडगार राहते.

 घरात जुना माठ असेल तर या ट्रिक्स वापरा

1- अगोदर माठ घासून घ्यावा घरात जर जुना माठ असेल तर त्याला खूप छोटे छोटे छिद्र असतात व त्यातून हवा खेळती राहते आणि पाणी थंड राहते. पण माठ जुना होतो तेव्हा त्यावर धूळ साचून छिद्र बुजले जातात

व त्यामध्ये पाणी थंड होत नाही. अशावेळी माठाचा वापर करण्याअगोदर त्याला व्यवस्थित घासून घ्यावा व त्याची बंद झालेली छिद्रे यामुळे मोकळी होतात व पाणी पुन्हा चांगले थंड होते.

2- योग्य ठिकाणी माठ ठेवावा माठ घरामध्ये ठेवताना अशा जागेची निवड करावी ज्या ठिकाणी थेटपणे ऊन येत नाही. जर तुम्ही थंडाव्याच्या ठिकाणी माठ ठेवला तर त्या ठिकाणी पाणी गरम होत नाही.

माठ खोलीमध्ये किंवा मोकळ्या जागी ठेवायचा असेल तर झाडाखाली किंवा सावली खाली ठेवणे योग्य होईल. ज्या ठिकाणी हवा खेळती राहते अशा ठिकाणी माठ ठेवावा.

3- वाळूचा वापर करावा माठ स्टॅन्ड वर ठेवत असल्यास स्टॅन्ड खाली वाळू ठेवणे चांगले होईल. माठातील पाणी वाळूच्या संपर्कात राहून थंड राहते.