Tips For Growth In Height: ‘हा’ एकच पदार्थ मुलांना न चुकता खायला घाला! मुलांची उंची वाढेल भरभर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tips For Growth In Height:- उंची ही आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी खूप महत्त्वाचीअसते. त्यामुळे अगदी लहानपणापासून पालकांचे मुलांच्या उंचीवर खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष असते. प्रत्येक पालकांना वाटते की आपल्या मुलाची उंची उत्तम असावी. आपण बऱ्याचदा पाहतो की बऱ्याच मुलांची उंची ही कमी असते किंवा ती हव्या त्या प्रमाणात वाढताना दिसून येत नाही.

तसेच बऱ्याच मुलांमध्ये उंची आणि वजनाच्या प्रमाणामध्ये बराच फरक दिसून येतो. उंची कमी असणे हे ज्याप्रमाणे आई-वडिलांच्या उंचीवर ठरत असते अगदी त्याचप्रमाणे ते तुमची जीवनशैली तसेच आहार कसा आहे तसेच व्यायाम इत्यादी गोष्टींवर देखील ठरते. यामध्ये तुम्ही संतुलित आहार ठेवणे खूप गरजेचे असते.

कारण संतुलित आहारामुळेच शरीरातील पेशी व अवयव यांचे योग्य पोषण होते. परंतु आताचा विचार केला तर जंक फुड खाण्याचे प्रमाण खूप वाढले असल्याने यामध्ये उंची वाढण्यामध्ये खूप समस्या निर्माण होऊ शकतात. लहान मुलांचा विचार केला तर लहान मुले प्रामुख्याने अनेक प्रकारचे बिस्किट किंवा ब्रेड यासारखे पदार्थ जास्त प्रमाणात खातात व त्याचा खूप विपरीत परिणाम हा आरोग्यावर होत असतो.

मुलांमधील उंची वाढण्याचा विचार केला तर एका ठराविक वयानंतर मुलांची उंची वाढत नाही. याकरता मुलांच्या हाडांची योग्य पद्धतीने वाढवणे गरजेचे असते व त्यांची उंची योग्य त्या वयात चांगली वाढावी हे देखील महत्त्वाचे असते. या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ वैद्य मिहीर खत्री त्यांनी एक साधा आणि सोपा उपाय सांगितलेला आहे. या उपायाच्या मदतीने उंची वाढण्यास मदत होऊ शकते.

 हा आहे लहान मुलांची उंची वाढण्यासाठीचा अगदी सोपा आणि साधा उपाय

1- अळीवाची खिरीचा वापर अळीवाची खीर हा उंची वाढण्यासाठीचा खूप उत्तम असा उपाय आहे. अळीव हे हाडांच्या मजबुतीसाठी आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघावी यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे लहान मुलांना उंची वाढवण्यासाठी अळीवाची खीर, नियमितपणे खायला दिल्यास उंची चांगली वाढण्यास मदत होते.

यामध्ये एक चमचा अळीव, एक कप दूध आणि दोन कप पाणी घालून हे सगळं चांगलं शिजवून घ्यायचे असते व चवीनुसार त्यामध्ये वेलची, खडीसाखर, थोडा गुळ घातला तरी चालतं. ही खीर मुलांच्या आरोग्यासाठी खूप उत्तम ठरते व एवढेच नाही तर हाड मजबूत होण्याकरिता व वाढ चांगली होण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.  मुले सोळा वर्षाची होईपर्यंत ही खीर त्यांना खायला दिल्यास खूप मोठा फायदा होतो.