Tulsi Plant Care Tips: घराच्या दाराजवळील तुळस सुकते का? करा ‘हे’ उपाय 10 दिवसात होईल तुळस हिरवीगार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tulsi Plant Care Tips:- ग्रामीण भागामध्ये जर आपण घर पाहिले तर असं तुरळक घर सापडेल की त्या घरासमोर तुळस नाही. बहुतांशी घरासमोर तुळस हे ग्रामीण भागात लावलेली असते. घरासमोर छानसं तुळशी वृंदावन बनवले जाते व त्यामध्ये तुळशीची रोपट्याची लागवड केली जाते.

त्यासोबतच शहरी भागांमध्ये देखील आपल्याला वृंदावन मध्ये नाही पण कुंडीत तुळस लावलेली दिसून येते. तुळशीला एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्व तर आहेच परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील तुळशीचे अनेक फायदे आहेत. बऱ्याच प्रकारच्या आजारांवर तुळस हा एक रामबाण उपाय आहे.

असे म्हटले जाते की तुळशीची तीन ते चार पाने उकळत्या दुधामध्ये टाकून जर उपाशीपोटी घेतले तर तुमचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते. तसेच तुळशीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी तत्व असल्यामुळे ते तुम्हाला साथीच्या आजारांपासून देखील दूर ठेवण्यास मदत करते.

असे अनेक फायदे तुम्हाला तुळशीचे सांगता येतील. घरासमोर आपण तुळशी लावतो व तिची खूप काळजी घेत असतो. परंतु बऱ्याचदा कितीही काळजी घेतली तरी तुळस सुकण्याचे प्रकार वाढतात. त्यासाठी आपण बऱ्याचदा  जास्त प्रमाणात पाणी तुळशीला देत असतो. परंतु तरीदेखील तुळशी कोरडीच होते. या सगळ्या समस्येवर जर आपल्याला उपाय हवा असेल तर आपण या लेखांमध्ये काही महत्त्वाची माहिती घेणार आहोत. जेणेकरून दारासमोर लावलेली तुळस हिरवीगार राहील.

 दारासमोरील तुळस हिरवीगार ठेवण्यासाठी महत्त्वाचे उपाय

1- आपल्या घरामध्ये दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा तरी चहा होत असते. चहा पिऊन झाल्यानंतर पातेल्यामध्ये जी काही चहा पावडर उरते ती आपण फेकून देतो. परंतु उरलेली ही चहा पावडर फेकून न देता तुम्ही जर तुळशीच्या रोपांच्या मुळांमध्ये टाकली तर तुळस हिरवीगार ठेवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.

2- असं जेव्हा आपण घरी भाजीपाला आणतो व भाजीपाला शिजवण्याआधी आपण काही भाज्यांची साल काढतो व ती देखील फेकून देतो. परंतु ही साल फेकून न देता जर तुम्ही घरच्या घरी त्याचे खत बनवले तर फायद्याचे ठरते. भाज्यांच्या सालीपासून तयार केलेले खत तुळशीलाच नाही तर इतर कोणत्याही झाडासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकतात.

3- तसेच तुळस हिरवीगार ठेवण्यासाठी तुम्ही शेणखताचा देखील वापर करू शकतात.

4- तुळशीला तुम्ही थोड्या थोड्या दिवसांनी खत टाकत राहणे व ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करणे खूप गरजेचे आहे. वर उल्लेख केलेल्या खतांसोबत जर तुम्ही सेंद्रिय खताचा वापर केला तर तुळस कायम हिरवीगार राहण्यास मदत होते.

 तुळशीचे आरोग्यदायी फायदे

1- तुळशीचे तीन किंवा चार पाने गरम दुधामध्ये टाकून जर तुम्ही घेतले तर नर्व्हस सिस्टमला आराम मिळतो व स्ट्रेस हार्मोन्सला देखील नियंत्रित करण्यासाठी मदत होते.

2- तसेच तुळस आणि दूध हे मिश्रण अँटीऑक्सिडंट असल्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. एवढेच नाही तर शरीरातील युरिक ॲसिड कमी करून किडनी स्टोन ला हळूहळू नष्ट करण्यास देखील मदत मिळते.

3- तुळशीमध्ये अँटिबॅक्टरियल तत्व असते व यामुळे गालांची सूज, कोल्ड आणि ड्राय कप नाहीसा करते.

4- तुळशीची तीन-चार पाने रोज उकळत्या दुधातून घेतल्यास डोकेदुखी कायमची नष्ट होते.

5- तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टरियल व अँटिव्हायरल तसेच अँटी इन्फ्लमेंटरी गुणधर्म असल्यामुळे अनेक रोगांना बरे करण्यासाठी मदत होते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील तुळस खूप फायदेशीर असून जिवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाची लढा देण्यासाठी शरीर मजबूत होते.

6- तुळशीची पाने व तुळशीच्या फुलांमध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्व असतात व अनेक आजारांना रोखून त्यांचा समूळ नाश करण्याची ताकद यामध्ये आहे. त्यामुळे अनेक आजारांवरील औषधांमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.

असे अनेक प्रकारचे आरोग्य विषयक फायदे सांगता येतील.