Weight Loss Tips:- सध्या धावपळीची जीवनशैली आणि संतुलित आहारापेक्षा जंक फूड्स ना दिले जाणारे प्राधान्य यावर इतर अनेक गोष्टींमुळे वजन वाढण्याची समस्या बऱ्याच जणांमध्ये दिसून येत आहे. वजन वाढल्यामुळे अनेक जण त्रस्त असून हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे डायट प्लॅन, जिम पासून अनेक गोष्टी करण्यावर भर दिला जात आहे.
परंतु या सगळ्या उपायोजना करताना मात्र खरोखरच वजन कमी होते का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण वाढलेले वजन हे अनेक गंभीर अशा शारीरिक समस्यांना निमंत्रण देऊ शकते. यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग, डायबिटीस, उच्च रक्तदाब, लिव्हर तसेच पोटाचा कर्करोग इत्यादी गंभीर आजारांचा धोका संभवतो.
त्यामुळे वजन कमी करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही एखादा सोपा आणि प्रभावी उपाय किंवा पद्धत शोधत असाल तर तुमच्यासाठी 30-30-30 चा फॉर्मुला वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. नेमका हा फार्मूला कसा आहे? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
काय आहे नेमका 30-30-30 चा फॉर्मुला?
यामध्ये प्रामुख्याने जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा उठल्यानंतर तीस मिनिटांच्या आत मध्ये तुम्ही 30 ग्रॅम प्रोटीनचे सेवन करावे व त्यानंतर लगेच तीस मिनिटे व्यायाम करावा. अशाप्रकारे साधा हा फॉर्म्युला आहे. या फार्मूला संबंधित जर आपण मूळ कल्पना पाहिली तर ती व्यक्तीच्या चयापचय गती वाढवण्याशी संबंधित आहे आणि तुम्हाला जास्त वजन वाढण्यापासून हा फॉर्म्युला प्रतिबंध करतो.
तसेच हा फॉर्म्युला तुम्हाला फक्त दिवसातून एकदा करावा लागतो. याबद्दल तज्ञाचे मत आहे की जेव्हा उठल्यानंतर तीस मिनिटाच्या आत मध्ये तुमच्या नाश्त्याच्या प्लेटमध्ये तीस ग्रॅम प्रथिने असणे म्हणजेच चयापचय वेग वाढवायला मदत होईल व त्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतील.
त्यानंतर तुम्हाला तीस मिनिटे हलकासा व्यायाम करावा लागेल व त्यामुळे खूप कॅलरीज बर्न होतील. तुम्ही सकाळी उच्च प्रथिनयुक्त नाश्ता घेतल्यामुळे दिवसभरात पुन्हापुन्हा भूक लागणार नाही. अशाप्रकारे हा फॉर्मुला आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी फायद्याचा ठरतो.
सकाळी नाष्ट्यात 30 ग्रॅम प्रोटीन तुम्ही जर घेतले तर दिवसभराची भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते.तसेच हे प्रथिन स्नायूंना मजबूत ठेवण्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका पार पडते. तसेच 30 ग्राम प्रोटीन घेतल्यानंतर तीस मिनिटे हलकासा व्यायाम तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी पुरेसा आहे.
त्यामुळे तुमचे वजन कमी होईलच परंतु हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होईल. या 30 मिनिटाच्या व्यायामामध्ये तुम्ही वेगात चालले तसेच सायकलिंग आणि पोहण्यासारखे व्यायाम करू शकता. अशा मुळे शरीरावर जास्त भार देखील पडत नाही आणि पुरेशा कॅलरीज बर्न होतात.
त्यामुळे तुम्ही जेव्हा सकाळचा नाश्ता कराल आणि व्यायाम कराल त्यावेळी लक्ष इकडे तिकडे भटकू देऊ नये तसेच जेवताना पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवावी. दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही व्यायाम कराल तेव्हा तुमचे लक्ष तुमच्या श्वासोश्वासावर असावे.
वजन कमी करण्यासाठी 30-30-30 चा फार्मूला वापरा परंतु या गोष्टी लक्षात ठेवा
1- प्रोटीनचा जास्त प्रमाणात वापर करू नये. नाहीतर त्याचा विपरीत परिणाम किडनीवर होऊ शकतो.
2- उच्च तीव्रतेचा व्यायाम करू नये कारण त्यामुळे स्नायूंवर ताण येऊ शकतो.
3- तसेच नाष्टामध्ये मिठाईचा समावेश करू नये. जर असे केले तर साखरेचे प्रमाण वाढू शकते.
4- तब्येत खराब असेल तर तुम्ही काही दिवसांपर्यंत हा फॉर्म्युला न केलेला बरा.