Health Tips In Summer:- उन्हाळा हा एक नकोसा असलेला ऋतू किंवा कालावधी असून या कालावधीत असलेल्या प्रचंड उष्णतेमुळे अनेक प्रकारचा त्रास प्रत्येकाला होताना आपल्याला दिसून येतो. सध्या तर गेल्या काही वर्षापासून पाहिले तर अति तीव्रतेचा उन्हाळा जाणवत असल्याने नको हा उन्हाळा म्हणण्याची वेळ आलेली आहे.
जर आपण पाहिले तर राज्यातील बऱ्याच जिल्ह्याचे तापमान हे 42 अंशांच्या पुढे असून अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. या अतितीव्र उन्हामुळे उष्माघातासारख्या अनेक समस्या उद्भवून जीवावर देखील बेतू शकते. याशिवाय आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे या कालावधीत आहार आणि जीवनशैली विषयी काही बदल आणि काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जर चांगले आरोग्य ठेवायचे असेल व होणाऱ्या त्रासापासून वाचायचे असेल तर छोट्या परतु महत्वाच्या टिप्स अंगी बाणवणे गरजेचे आहे.
या टिप्स वापरा आणि उन्हाळ्यात आरोग्य सांभाळा
1- आहारात या फळांचा वापर करा– उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने आहारात काही गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असून यामध्ये तुम्ही गहू आणि तांदूळ, ओट्स सारख्या धान्याचा समावेश करू शकतात. कारण ही धान्य पोषक तत्वांनी समृद्ध असून फायबरने समृद्ध आहेत.
उन्हाळाच्या कालावधीमध्ये ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी सारख्या फळांचा समावेश आहारात असणे गरजेचे असून यामध्ये अँटिऑक्सिडंट जास्त असल्यामुळे अशा फळांचा खूप मोठा फायदा होतो व त्यासोबत इतर फळे देखील भरपूर खाल्ली गेली पाहिजे.
2- शरीर हायड्रेटेड ठेवा– उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील ऊर्जेत वाढ करणे अत्यंत गरजेचे असते. या कालावधीत पुरेसे पाणी पिणे हे पचन आणि ऊर्जेची पातळी उत्तम ठेवण्याकरिता फायद्याचे ठरते व सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त गरज ही पाण्याची असते. या कालावधी शरीरातील पाणी झपाट्याने कमी होऊन पाण्याची कमतरता भासू शकते व त्यामुळे पाणी पीत राहणे खूप गरजेचे आहे.
3- पुरेशी झोप घ्या– चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असून या कालावधीत जर झोपेची कमतरता राहिली तर मधुमेह आणि लठ्ठपणा तसेच नैराश्य सारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. झोपेचे एक वेळापत्रक तयार करून घेणे व प्रत्येक रात्री सात ते नऊ तास उत्तम झोप येणे खूप गरजेचे आहे.
4- डोळ्यांची काळजी घ्यावी– जर उन्हामध्ये काम करत असाल किंवा खेळत असाल तर तुमच्या डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. याकरिता संरक्षणात्मक चष्मा घालणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कमीत कमी 99% अल्ट्रा व्हायलेट किरणांना रोखू शकेल असा बाहेरील सन ग्लासेस घालावा.
5- फ्रेश व चांगला आहार घेणे– उन्हाळ्यामध्ये मसालेदार पदार्थ खाणे कटाक्षाने टाळणे गरजेचे आहे. मसाल्याच्या पदार्थांशिवाय शिळे पदार्थ तसेच तेलकट पदार्थ देखील खाऊ नये. पॅकेजिंग पदार्थ देखील खायायचे टाळले तर फायदाच मिळतो. डीहायड्रेशन पासून जर वाचायचे असेल तर चहा तसेच कॉफी सारख्या पदार्थांचे सेवन करावे.