Weight Loss Tips :- सध्याची धकाधकीची आणि धावपळीची जीवनशैली आणि संतुलित आहाराची कमतरता आणि प्रचंड प्रमाणात जंक फूडचे सेवन इत्यादीमुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्य विषयक समस्या उद्भवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्या जीवनशैलीमुळे सगळ्यात मोठी उद्भवणारी समस्या म्हणजे वाढते वजनाची होय.
कित्येक जण या वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त असून वाढलेले हे वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करताना आपल्याला दिसतात. यामध्ये आहार नियंत्रण तर जिम मध्ये जाऊन विविध प्रकारचे व्यायाम करण्यापासून अनेक उपाययोजना अवलंबल्या जातात.
परंतु तरीदेखील हवा तितका फरक किंवा परिणाम आपल्याला दिसून येत नाही. वाढत्या वजनामुळे मोठ्या प्रमाणावर हृदयरोग तसेच मधुमेह आणि रक्तदाबा सारख्या समस्या उद्भवत असल्यामुळे देखील खूप समस्या निर्माण होते.
अशाच प्रकारे तुम्ही देखील वाढत्या वजनाच्या त्रस्त असाल वजन कमी करण्यासाठी आणि वाढलेले पोट कमी करण्यासाठी प्रयत्नशील असाल तर आहारामध्ये काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केला तर तुम्ही वाढत्या पोटापासून काही दिवसात सूटका मिळवू शकतात.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी महत्त्वाचा आहार
1- दालचिनी– जर आपण मेडिसिन नेटचा रिपोर्ट बघितला तर त्यानुसार दालचिनीमुळे मेटाबोलिजम वाढायला मदत होते व रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहते. तसेच दालचिनी सेवनामुळे थकवा देखील येत नाही व पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊन पचनक्रिया उत्तम राहते. मेंदूचे कार्य सुधारते आणि हृदय रोगाचा धोका देखील कमी होतो. वाढलेले पोट म्हणजेच बेली फॅट कमी करायचे असेल तर दालचिनीला आपल्या आहाराचा भाग बनवणे गरजेचे आहे.
जर आपण दालचिनी सेवनाची पद्धत पाहिली तर याकरिता अगोदर दालचिनीला पाण्यामध्ये भिजवून ठेवावे आणि जेवण झाल्यावर गाळून या पाण्याचे सेवन करावे. दालचिनी मध्ये फायबर्स जास्त असतात व यामुळे बऱ्याच वेळ पर्यंत पोट भरलेले राहते व इतर पदार्थ व्यक्ती खात नाही लवकर भूक देखील लागत नाही.
2- एप्पल सायडर विनेगर– एप्पल साइडर विनेगर आपणास देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप फायद्याचा समजला जातो. जेवणाआधी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा एप्पल साइडर विनेगर मिसळून प्यावे. यामुळे पोटाची चरबी कमी होण्याला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. तसेच सॅलेड मध्ये घालून जर तुम्ही एप्पल साइडर विनेगरचे सेवन केले तरी फायदा होतो.
3-मेथीच्या बिया– जर आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिपोर्ट बघितला तर त्यानुसार बेली फॅट कमी करण्याकरिता मेथीच्या बियांचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. जर आपण मेथीच्या बियांच्या सेवनाची पद्धत पाहिली तर याकरिता तुम्हाला एक चमचा मेथीच्या दाण्यांना संपूर्ण रात्रभर भिजवून ठेवावे लागेल व सकाळी गाळून या पाण्याचे सेवन करावे लागेल. असे केल्यामुळे कमीत कमी वेळेत तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.
4- ड्रायफ्रूट– पोटाची चरबी कमी करण्याकरिता ड्रायफूटचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. पोटाची चरबी कमी करायची असेल तर सकाळच्या नाश्ता जेव्हा कराल तेव्हा त्यामध्ये ड्रायफ्रूट चे सेवन करावे. याकरिता रात्री पाण्यामध्ये ड्रायफ्रूट्स भिजवून ठेवावे. जर आपण याबाबतीतले संशोधन पाहिले तर त्यानुसार गुड फॅट्स मनुसॅच्युरेटेड फॅट, ओमेगा तीन फॅटी ऍसिड्स युक्त बिया या वाढलेले पोट कमी करण्यासाठी खूप फायद्याच्या ठरतात.