Weight Loss Tips: कितीही भात खाल्ला तरी नाही वाढणार वजन! भात शिजवताना टाळा ‘या’ चुका, होईल फायदाच फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weight Loss Tips:- अचानक वजन वाढणे किंवा लठ्ठपणाची समस्या यामुळे बरेच जण त्रस्त आहेत. वाढत्या वजनामुळे अनेक प्रकारच्या व्याधी तर शरीराला जडतातच परंतु महत्त्वाचे म्हणजे हृदयरोग, उच्च रक्तदाबा सारख्या समस्या देखील निर्माण होतात. या अनुषंगाने आपण पाहतो की वाढलेले वजन कमी करण्याकरिता अनेक उपाय अवलंबले जातात.

यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाइट, एक्सरसाइज यासारख्या अनेक उपाय योजनांचा समावेश आपल्याला करता येईल. परंतु तरीदेखील हव्या त्या प्रमाणामध्ये वजन कमी होताना दिसून येत नाही. वजन कमी व्हावे म्हणून आहारामध्ये देखील अनेक प्रकारचे पथ्य पाळले जातात. यातील प्रमुख पथ्य जर आपण पाहिले तर लोक भात खाणेच बंद करतात. बरेच जण आपल्याला सांगत असतात की वजन कमी करायचे असेल तर भात खाणे बंद करावे.

परंतु खरंच भात खाल्ल्याने वजन कमी होते का? याबाबत आपल्याला अनेक समज गैरसमज दिसून येतात. जर आपण दक्षिण भारताचा विचार केला तर त्या ठिकाणचे प्रमुख अन्न हे भातच आहे. परंतु तरीदेखील तिकडचे लोक लठ्ठ का होत नाहीत? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. नेमकी यामागे काय कारण असू शकते? हा देखील प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल. नेमके याच कारणांचा शोध आपण या लेखात घेणार आहोत.

 दक्षिण भारतातील लोकांची भात शिजवण्याची पद्धत

जर प्रामुख्याने आपण दक्षिण भारतातील लोकांचा विचार केला तर त्या ठिकाणी प्रामुख्याने पॉलिश न केलेल्या साध्या भाताचा आहारात समावेश केला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भात शिजवताना तो कुकरमध्ये न शिजवता त्याकरिता प्रामुख्याने पातेले वापरले जाते. जेव्हा पातेल्यामध्ये भात शिजवायला ठेवतात तेव्हा त्यावर जो फेस असतो तो काढून टाकला जातो व नंतर तांदूळ शिजवला जातो.

ही पद्धत त्या ठिकाणी प्रामुख्याने वापरली जाते. त्यामुळे याचे सगळे गणित भात शिजवण्याच्या पद्धतीत दडले आहे असे आपण म्हणू शकतो.भात शिजवण्याच्या पद्धतीमध्ये जर बदल केला तर तुम्ही जास्त आरोग्यदायी राहू शकतात. भात शिजवण्याच्या पद्धतीत बदल केल्यामुळे भारतातील पोषक घटक आपल्याला मिळतीलच परंतु वजन देखील वाढणार नाही.

 भात शिजवा परंतु या चुका टाळा

भात खाऊन वजन वाढणे यामागे प्रामुख्याने दोन किंवा तीन वेळा पॉलिश केलेला तांदूळ खाणे, भात व्यवस्थित न शिजवणे तसेच त्यावरील फेस आलेलं पाणी न काढणे, भात कुकरमध्ये शिजवणे यासारख्या चुकांमुळे भातातील पोषक मूल्य कमी होते व त्यामुळेच वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

भातामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही भात खाल्ला तर दिवसभरात शरीराला आवश्यक ऊर्जा या माध्यमातून मिळते. पांढऱ्या भाताचे जर पौष्टिक मूल्य वाढवायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या तसेच डाळी किंवा सोयाबीन मिसळून त्याचा आहारात समावेश करू शकतात.

तसेच प्रामुख्याने म्हणजे तांदूळ विकत घेताना देखील काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. यामध्ये जर तुम्ही चांगल्या दर्जाचा लांब तुकड्याचे तांदूळ विकत घेतले तर फायद्याचे ठरते. कारण अशा प्रकारच्या तांदूळ मध्ये छोट्या तांदळाच्या तुलनेत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. तसेच तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रात्री भात न खाता तो दुपारी खावा व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्हाईट राईस ऐवजी ब्राऊन राईस सेवन करणे गरजेचे आहे.