उन्हाळा म्हटले म्हणजे सगळीकडे कडकडीत ऊन, त्यामुळे जाणवणारा प्रचंड उकाडा, जीवाची होणारी प्रचंड घालमेल या सगळ्या गोष्टींमुळे व्यक्ती त्रस्त होऊन जातात. त्यामुळे बरेच जण या उकाड्यापासून थोडासा का होईना दिलासा मिळावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे ज्यूस पिण्यावर भर देतात.
तसेच दूध,लस्सी किंवा ताक सारख्या दुग्धजन्य पदार्थांचा देखील या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पिण्यासाठी वापर केला जातो. परंतु या व्यतिरिक्त ज्या लोकांना ड्रिंक करायचे सवय असते म्हणजेच दारू प्यायची सवय असते त्यांची मात्र या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दारूचा ब्रँड कोणता प्यावा? त्याबद्दल मात्र गोंधळ उडतो. दारू जरी शरीराला हानिकारक असली तरी देखील काही लोक एक आनंद म्हणून दारूचे सेवन करतात.
अशा परिस्थितीत उन्हाळ्यामध्ये काही लोक दारूचा ब्रँड बदलण्याचा विचार करतात. उन्हाळ्यामध्ये शरीरावर त्याचा चुकीचा परिणाम होऊ नये हा त्यामागचा दृष्टिकोन असतो. कारण दारू पिणारे बहुतांश व्यक्ती हे बियर, वाईन तसेच वोडका, व्हिस्की किंवा रम इत्यादी प्रकारचा ब्रँड पिण्यासाठी वापरतात. परंतु उन्हाळ्यामध्ये यातील काय प्यावे किंवा काय पिऊ नये? त्याबद्दल मात्र गोंधळ उडतो. त्याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेऊ.
उन्हाळ्यात बियर, वाईन, रम किंवा व्हिस्की पैकी कोणती दारू राहील चांगली?
1- बियर– बियर हे सर्वात लाईट ड्रिंक समजले जाते. कारण साधारणपणे बिअर मध्ये अल्कोहोलचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याकरिता उन्हाळ्याच्या कालावधीत बरेच लोक बियर पिण्याला प्राधान्य देतात. परंतु यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे बियरमध्ये अल्कोहोल जरी कमी राहिले परंतु कॅलरी सर्वात जास्त असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका संभवतो.
2- व्हिस्की– याव्यतिरिक्त तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये व्हिस्की पिण्याचा निर्णय घेतला तर हे थोडं स्ट्रॉंग अल्कोहोल ज्या व्यक्तींना हवे असेल त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत व्हिस्कीचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
3- वाईन– जर तुम्ही ड्रिंकमध्ये अल्कोहोल आणि त्यासोबत चवीला जर पसंती देत असाल तर तुम्हाला वाईन हा एक चांगला पर्याय असतो. परंतु वाईनमध्ये बियर पेक्षा जास्त प्रमाणात अल्कोहोल असते.
4- रम– बरेच व्यक्ती असे म्हणतात की रम हे उन्हाळ्याच्या कालावधीत किंवा उष्ण वातावरणामध्ये पिणे योग्य नाही. ते थंड वातावरणामध्ये प्यायला चांगले समजले जाते. कारण रममध्ये जे काही पदार्थ असतात ते शरीराला उबदार ठेवण्यासाठी मदत करतात. परंतु या तत्वाला कुठेही पुरावा अद्यापपर्यंत नाही.
एका उदाहरणावरून समजून घेता येईल. वेस्टइंडीज, क्युबा,जमैका इत्यादी उष्ण वातावरण असलेल्या देशांमध्ये रम वर्षभर पिली जाते. वेस्टइंडीज मध्ये रम पहिल्यांदा तयार करण्यात आली असे देखील म्हटले जाते. जर आपण वेस्टइंडीज चे तापमान पहिले तर ते बाराही महिने उष्ण आहे. त्यामुळे मग जर रम मुळे उन्हाळ्यात किंवा उष्णतेत त्रास होत असता तर या देशांमध्ये रम इतकी प्रसिद्ध किंवा लोकप्रिय नसती.
बियर, वाईन, व्हिस्कीमध्ये काय आहे फरक?
1- बियर– बिअर मध्ये साधारणपणे तीन ते 30 टक्क्यांपर्यंत अल्कोहोलचे प्रमाण असते. परंतु त्या तुलनेत लाईट बियर असेल तर त्यामध्ये चार टक्के आणि स्ट्रॉंग बिअर असेल तर 8% इतके अल्कोहोल असते. जर्मनीमधील बियर जगातील सर्वात उत्तम बियर मानली जाते. या ठिकाणी मका, गहू आणि धान्याला काही प्रमाणामध्ये आंबवले जाते व त्यानंतर बियर एक ते दोन आठवड्यात तयार होते.
2- वाईन– हा एक दारूचाच प्रकार आहे व वाईन बनवण्याकरिता प्रामुख्याने फळांचा रस वापरला जातो. यामध्ये जास्त प्रमाणात द्राक्ष वापरले जातात. वाईनमध्ये साधारणपणे 9 ते 18 टक्क्यांपर्यंत अल्कोहोलचे प्रमाण असते. साधारणपणे फ्रान्समध्ये वाईनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते व बियर सारखेच वाईन देखील तयार केली जाते. वाईनला रंगाच्या नावाने संबोधले जाते. जसे की रेड वाइन किंवा व्हाईट वाइन या नावाने वाईन ओळखली जाते. तसेच द्राक्षांचा दर्जा आणि त्यांचा प्रकारानुसार देखील वाईनचे नाव ठरवले जाते.
3- व्हिस्की– साधारणपणे व्हिस्की पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. व्हिस्की तयार करण्यासाठी गहू आणि धान्याचा वापर केला जातो व व्हिस्की तयार करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. व्हिस्की बनवण्यासाठी थोड्या प्रमाणात धान्य अंबवून घेतलं जात नाही तर धान्य पूर्णपणे अंबवले जाते व त्यानंतर व्हिस्की तयार होते. व्हिस्की मध्ये अल्कोहोलचे प्रमाण तब्बल 30 ते 65 टक्के असते व सरासरी अल्कोहोलचे प्रमाण हे 43 टक्क्यांपर्यंत असते.
व्हिस्की मध्ये माल्ट व्हिस्की आणि दुसरी ग्रेन व्हिस्की असे दोन प्रकारे येतात. यामध्ये मार्ट व्हिस्कीला मोड आलेल्या धान्यांपासून बनवतात व ही व्हिस्की चांगली व किमतीला जास्त असते. तर त्या तुलनेत ग्रीन व्हिस्की ही मोड न आलेल्या धान्यापासून बनवली जाते. स्कॉटलंड या देशांमध्ये व्हिस्की मोठ्या प्रमाणावर उत्पादित होते या ठिकाणी व्हिस्कीला स्कॉच असं म्हणतात.