file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कान्हूरपठार गटात राष्ट्रवादी पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेत रुजवून याच विचारसरणीच्या व्यक्तीस निवडून देण्याचे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले आहे.

पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथे विविध विकासकामाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. वडगाव दर्या गावााातील रस्ता,

तीर्थथक्षेत्र बायपास रस्ता, दलित वस्ती अंतर्गत,जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी, सभामंडप फरशी बसवणे,अंगणवाडी या विविध विकासकामांंचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

ते पुढे म्हणाले कान्हूरपठार गटात येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शनसाठी कामाला लागण्याच्या सूचनाही आमदार निलेश लंके यांनी तरुण कार्यकर्त्यांना दिल्या आहे. वडगाव दर्या गाव व देवस्थानाच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.