ऑक्टोबर महिन्यामध्ये तयार होत आहेत 4 महत्त्वाचे राजयोग! ‘या’ राशींचे उजळेल नशीब तसेच नोकरीत मिळेल बढती व भरपूर प्रमाणात मिळेल पैसा

ज्योतिष शास्त्रामध्ये राशी आणि नक्षत्र तसेच नऊ ग्रह यांचे खूप महत्त्व असून प्रत्येक ग्रह ठराविक वेळेत राशी परिवर्तन करत असतो व त्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि संपूर्ण जगावर देखील दिसून येतो. या दृष्टिकोनातून आपण सुरू असलेला ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर या महिन्यांमध्ये चार राजयोग तयार होत असून  यांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम काही राशींवर होणार आहे.

Ajay Patil
Published:
raj yoga

ज्योतिष शास्त्रामध्ये राशी आणि नक्षत्र तसेच नऊ ग्रह यांचे खूप महत्त्व असून प्रत्येक ग्रह ठराविक वेळेत राशी परिवर्तन करत असतो व त्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि संपूर्ण जगावर देखील दिसून येतो. या दृष्टिकोनातून आपण सुरू असलेला ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर या महिन्यांमध्ये चार राजयोग तयार होत असून  यांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम काही राशींवर होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर चंद्रापासून  पहिल्या, चौथ्या तसेच सातव्या किंवा दहाव्या भावात शनिदेव तूळ, मकर किंवा कुंभ राशीत असतील तर अशा कुंडलित शशा राजयोग तयार होतो.

त्याप्रमाणेच बुध जर मिथुन किंवा कन्या राशीच्या  पहिल्या किंवा चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या घरात स्थित असेल किंवा कुंडलीमध्ये जर चंद्र असेल तर तुमच्या कुंडलीत भद्रा राजयोग तयार होतो.

तसेच शुक्र हा वृषभ, तुळ किंवा मीन राशिच्या पहिल्या किंवा चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या घरात स्थित असेल व कुंडलित चंद्र असेल तर मालव्य राजयोग तयार होतो. अशाप्रकारे हे राजयोग तयार होत असतात व त्यांचा परिणाम हा त्या त्या राशींवर होतो.

 या राजयोगांमुळे या तीन राशींचे चमकेल नशीब मिळेल भरपूर पैसा

1- सिंह राशी ऑक्टोबर महिन्यामध्ये एकत्र चार राजयोग तयार होत असल्यामुळे सिंह राशींच्या व्यक्तींना नशिबाची खूप मोठी साथ मिळणार असून नोकरदारांना इतर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच नोकरीमध्ये प्रमोशन आणि परदेश दौऱ्यावर जाण्याची देखील शक्यता आहे.

काही जुनाट आजार असतील तर त्यापासून आराम मिळू शकतो व उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील निर्माण होऊ शकतात. तसेच सिंह राशींच्या व्यक्तींना काही उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यात या कालावधीत यश मिळू शकते. इतकेच नाही तर या व्यक्तींच्या दैनंदिन उत्पन्नात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

2- तूळ राशी ऑक्टोबर महिन्यात चार राजयोगांच्या मुळे तूळ राशींच्या व्यक्तींसाठी खूप शुभ कालावधी असणार असून या व्यक्तींसाठी हा कालावधी वरदानापेक्षा कमी नसणार आहे. या व्यक्तींना या कालावधीत नोकरीची संधी मिळण्याची दाट शक्यता असून ऑक्टोबर महिना तुमच्या प्रेम जीवनासाठी देखील एक अविस्मरणीय असणार आहे.

या कालावधीत सुख समृद्धीत वाढ होऊ शकते. इतकेच नाही तर नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या कालावधीत वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा देखील योग येऊ शकतो.

3- वृषभ राशी या चार राजयोगा मुळे या राशींच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर लाभ होण्याची शक्यता असून करियर आणि व्यवसायामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर वेळोवेळी अचानकपणे आर्थिक लाभ देखील होईल

व त्यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. बऱ्याच कालावधीपासून रखडलेली कामे असतील तर ती या कालावधीत पूर्ण होतील व या राशीच्या व्यक्तीच्या इच्छा देखील पूर्ण होतील. या कालावधीत तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल.

( टीप वरील माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून तुमचा उद्देश फक्त माहिती देणे एवढाच आहे. या माहितीविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा किंवा समर्थन करत नाहीत.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe