Horoscope: मार्चपासून ‘या’ राशींच्या व्यक्तींचा वाढेल बँक बॅलन्स! कारण शनीची ही स्थिती……

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Horoscope:- नवीन वर्षाचा पहिला महिना सुरू असून जवळजवळ आता जानेवारी महिना हा संपत आला असून लवकरच फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होत आहे. या सुरू झालेल्या नवीन वर्षामध्ये ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार झालेत व या योगांचा चांगला किंवा विपरीत परिणाम हा प्रत्येक राशींवर होणार आहे.

जर आपण ग्रहांचा विचार केला तर एक ठराविक कालावधीमध्ये ते त्यांच्या राशीत परिवर्तन करत असतात व याचा नक्कीच परिणाम हा राशींवर दिसून येतो. यामध्ये जर आपण न्यायदेवता म्हणून ओळखले जाणाऱ्या शनिदेवांचा विचार केला तर त्यांना सर्वात शक्तिशाली देवता म्हणून मान आहे.

कर्मानुसार फळ देणारी देवता म्हणून देखील शनिदेव ओळखले जातात. याच शनिदेव आणि त्यांचा मित्र म्हणून ओळखले जाणारे शुक्रदेव यांची येत्या मार्च महिन्यामध्ये युती होणार असून ती कुंभ राशीमध्ये होणार आहे. ही दोन्ही ग्रहांची युती खूप शुभ परिणाम देणारी ठरणार असून काही राशींना या युतीचा खूप मोठा फायदा होणार आहे व धनसंपत्तीचा योग देखील चालून येणार आहे. नेमक्या त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत? याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 या राशींवर होईल धनवर्षाव?

1- वृश्चिक शनि आणि शुक्र या मित्र ग्रहांची युती वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायद्याची सिद्ध होणार आहे. व्यापारी वर्गाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशींचे जे व्यक्ती राजकारणामध्ये असतील त्यांना पुढे येण्यासाठीच्या महत्त्वाच्या संधी मिळतील.

तसेच नोकरीच्या ठिकाणी पगारात वाढ होण्याची देखील शक्यता आहे व उच्च पद मिळेल हे देखील शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून करिअरच्या प्रगती करिता खूप चांगल्या पद्धतीने मार्ग मिळतील. वृश्चिक राशीचे जे व्यक्ती व्यावसायिक आहे त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

2- वृषभ शुक्र आणि शनीची कुंभ राशीतील युती वृषभ राशींच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरू शकते व या राशींच्या लोकांचे आर्थिक उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल अशी देखील शक्यता आहे. तुमचा काही दिवसांपासून पैसा अडकलेला असेल तर तो देखील या कालावधीत परत मिळण्याची शक्यता आहे.

तसेच आर्थिक उत्पन्नाचे काही स्त्रोत देखील निर्माण होऊ शकतात. अगोदर पेक्षा तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर वृषभ राशींच्या व्यक्तींची करिअरमध्ये देखील खूप प्रगती होण्याची शक्यता आहे. जे व्यक्ती  अविवाहित असतील त्यांचे लग्न ठरण्याची देखील शक्यता आहे.

3-सिंह शुक्र आणि शनि देवाची युती ही सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायद्याचे ठरू शकते. या दोन्ही ग्रहांच्या युतीपुढे सिंह राशींच्या काही व्यक्तींना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच काही मोठे पद आणि मान सन्मानात देखील वाढ होईल अशी शक्यता आहे.

लक्ष्मीच्या कृपेने भरपूर संपत्ती मिळण्याची देखील शक्यता असून व्यावसायिकांसाठी हा काळ खूप उत्तम ठरेल. या कालावधीत जर तुम्ही गुंतवणूक कराल तर ती तुम्हाला फायदा देऊन जाईल.

( टीपवरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करीत नाहीत.)