Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेली मुले करतात राजकारणात प्रगती आणि कमवतात प्रचंड पैसा! वाचा यामध्ये आहे का तुमच्या मुलाची जन्मतारीख?

Ajay Patil
Published:
numerology

Numerology:- ज्याप्रमाणे भारतीय लोकांमध्ये ज्योतिषशास्त्राला महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे अंकशास्त्राला देखील आहे. ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीचे जन्म दिनांक किंवा इतर  गोष्टींवरून त्या व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये देखील व्यक्तीचे भविष्य हे व्यक्ती जन्मलेली तारीख म्हणजेच त्याची जन्मतारीख व जन्माची वेळ यावरून निश्चित करण्यात येते.

साधारणपणे अंकशास्त्रामध्ये मुलांक संख्येला खूप महत्त्व असून हे मुलांक एक ते नऊ पर्यंत असतात. व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झालेला आहे त्या तारखेवरून व्यक्तीचा मूलांक काय आहे हे आपल्याला काढता येते. उदाहरणार्थ मुलांक जर काढायचा असेल तर याकरिता जन्मतारखेची बेरीज करावी लागते.

उदाहरणच घ्यायचे झाले तर एखाद्या मुलाचा जन्म 21 तारखेला झाला असेल तर त्या मुलाचा मुलांक हा 2+1=3 येतो म्हणजेच 21 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक हा तीन असतो. अगदी याच प्रमाणे जर आपण माहिती घेतली तर 1,10,19 28 तारखेला जन्मलेले जे काही मुलं किंवा व्यक्ती आहेत त्यांचा मुलांक हा एक असतो व एक मुलांक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आणि करिअर कसे असते याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 एक मुलांक असलेली मुले आयुष्यात कशी असतात किंवा एक मुलांक असलेल्या व्यक्तींचे करिअर किंवा स्वभाव कसा असतो?

ज्याप्रमाणे आपण पाहिले की ज्या व्यक्तींचा जन्म एक, दहा, 19 आणि 28 तारखेला झालेला आहे अशा व्यक्तींचा मुलांक एक असतो. जर आपण अंकशास्त्रानुसार बघितले तर एक हा क्रमांक सूर्याचा मूळ स्वामी म्हटला जातो व सूर्य देवाला ग्रहांच्या राजा असे म्हटले जाते. त्यामुळे अंकशास्त्रानुसार एक मूलांक असणाऱ्या लोकांमध्ये अशाच प्रकारचे गुण आपल्याला बघायला मिळतात. साधारणपणे या व्यक्तींमध्ये…

1- एक मुलांक असणाऱ्या लोकांमध्ये नेतृत्व गुण खूप उत्तम असतो व ते इतर लोकांशी संवाद साधण्यांमध्ये खूप चतुर असतात.

2- सामाजिक क्षेत्रामध्ये देखील या लोकांना मानसन्मान चांगला मिळतो व आजूबाजूला नेहमीच लोकांचा गराडा देखील पाहायला मिळतो. त्यांच्या विशेष स्वभावामुळे ते माणसे जोडण्यामध्ये यशस्वी ठरतात व अशी माणसे त्यांना भविष्यामध्ये खूप मदत करतात. तसेच एक मुलांक असलेल्या व्यक्तींना इतर सहजपणे मदत करायला तयार असतात.

3- महत्त्वाचे म्हणजे एक मुलांक असलेली व्यक्ती राजकारणात देखील चांगले काम करतात.कुठलेही काम करण्यामध्ये जे काही आवश्यक ऊर्जा लागते ती त्यांच्यामध्ये ठासून भरलेली असते. त्यांचा स्वभावच असा असतो की ते त्यामुळे अनेक लोकांचे मन सहजपणे जिंकू शकतात.

4- विशेष म्हणजे या तारखांना जे काही व्यक्ती जन्मलेले आहेत या व्यक्तींचे पाच मुलांक असणाऱ्या व्यक्तींशी खूप प्रेमाचे संबंध असतात. ज्या व्यक्तींचा मुलांक एक आहे त्यांना मुलांक 9 असणाऱ्या व्यक्तींचा पूर्ण पाठिंबा मिळतो.

5- तसेच हे लोक कामांमध्ये अतिशय शिस्तप्रिय व शिस्तबद्ध असतात. परंतु त्यांना कधी कधी काही बाबतीत आक्रमक बनवते. या लोकांचा स्वभाव थोडासा हट्टी असतो व त्यांच्या मनाप्रमाणे कुठलीही गोष्ट व्हावी अशी त्यांची नेहमी इच्छा दिसून येते.

6- तसेच हे व्यक्ती कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही आणि स्वाभिमानी देखील असतात. जर कोणी त्यांचा स्वाभिमान दुखावला तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. एक मुलांक असलेल्या व्यक्ती दिसायला देखील सुंदर असतात व त्यांचे डोळे अधिक बोलके दिसतात.

7- विशेष म्हणजे या लोकांना पैसे कमवायला आणि ते पैसे जमवायला देखील खूप आवडते. पैशांच्या बाबतीत या लोकांची परिस्थिती नेहमी चांगली असते. एक मुलांक असलेल्या व्यक्तींचे मुलांक दोन, तीन आणि नऊ असणाऱ्या व्यक्तींची सहजपणे जुळते.

8- तसेच हे कामाच्या बाबतीत खूप हुशार आणि बुद्धिमान व चतुर देखील असतात. त्यांना स्वतःचे काम करायला स्वतः आवडते. परंतु जर कुठल्याही बाबतीत त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली तर त्यांना खूप राग येण्याची शक्यता असते. एक मुलांक असणाऱ्या व्यक्तींचा एक विशेष गुण म्हणजे या लोकांना कोणाच्याही हाताखाली काम करायला अजिबात आवडत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe