कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेले लोक असतात पैशांनी श्रीमंत आणि असतात तितकेच खर्चिक! वाचा तुमची जन्मतारीख आहे का यात?

ज्योतिषशास्त्र व अंकशास्त्र या माध्यमातून आपल्याला कोणत्याही व्यक्तीचे भविष्य किंवा त्याच्या एकंदरीत आयुष्याचा अंदाज सांगितला जातो व आपल्या भविष्याविषयी किंवा जीवन जगत असताना आपण ते कशा पद्धतीने जगू शकतो? तसेच आपले व्यक्तिमत्त्व कसे असते? इत्यादी बद्दल माहिती मिळत असते.

Ajay Patil
Published:
numerology

Numerology:- ज्योतिषशास्त्र व अंकशास्त्र या माध्यमातून आपल्याला कोणत्याही व्यक्तीचे भविष्य किंवा त्याच्या एकंदरीत आयुष्याचा अंदाज सांगितला जातो व आपल्या भविष्याविषयी किंवा जीवन जगत असताना आपण ते कशा पद्धतीने जगू शकतो? तसेच आपले व्यक्तिमत्त्व कसे असते? इत्यादी बद्दल माहिती मिळत असते.

ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह व ताऱ्यांच्या आधारे व्यक्तीचे एकंदरीत भविष्य सांगितले जाते किंवा व्यक्तीचा जन्म कोणत्या दिवशी झाला किंवा त्याची जन्मतारखेवरून देखील ज्योतिष शास्त्रानुसार संबंधित व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते.

अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीचे जर भविष्य बघायचे असेल किंवा त्याचा अंदाज घ्यायचा असेल तर संबंधित व्यक्तीचा जन्म कोणत्या तारखेला झालेला आहे व त्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मुलांक कोणता आहे यावरून संबंधित व्यक्तीचे भविष्य वर्तवले जाते.

अगदी याच अनुषंगाने जर आपण कोणत्याही महिन्याच्या सहा, 15 किंवा 24 तारखेला ज्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे. अशी व्यक्ती आयुष्यामध्ये कसे असतात किंवा त्यांच्या आयुष्य कसे जाते? याबद्दलची या लेखात माहिती घेऊ आणि विशेष म्हणजे या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक हा सहा असतो.मुलांक म्हणजे जन्मतारखेतील दोन अंकांची बेरीज करून जो एक अंक मिळतो तो त्या व्यक्तीचा मुलांक असतो.

कोणत्याही महिन्याच्या सहा, 15 किंवा 24 तारखेला जन्म झालेल्या लोकांवर असते लक्ष्मीची कृपा
कोणत्याही महिन्याच्या सहा, 15 किंवा 24 तारखेला ज्या व्यक्तींचा जन्म झालेला असेल त्यांची मूळ संख्या म्हणजेच मुलांक 6 असतो. अंकशास्त्रानुसार बघितले तर सहा मुलांकाचा स्वामीग्रह शुक्र मानला जातो व शुक्र हा संपत्ती तसेच भव्यता व सौंदर्य,

आकर्षण आणि प्रेम यांचा कारक आहे. त्यामुळे या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अपार स्वरूपात सुख-समृद्धी प्राप्त होते व या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची सदैव कृपा असते व त्यांना देवी लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होते.

स्वभावाने असतात विनोदी व लोक मोठ्या प्रमाणावर होतात त्यांच्याकडे आकर्षित
वरील जन्म तारखांना जन्मलेले लोक म्हणजेच सहा मुलांक असलेल्या व्यक्ती कलाप्रेमी आणि कलाचे भोक्ते असतात. या व्यक्तींना संगीत तसेच फॅशन व मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित गोष्टींमध्ये मोठी आवड असते.

तसेच स्वभावाने ते खूपच विनोदी असतात व कुठे जरी गेले तरी तेथील वातावरण पॉझिटिव्ह एनर्जीने भरून टाकतात. तसेच दिसायला देखील हे लोक आकर्षक असतात व त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर इतर लोक आकर्षित होतात.

महागड्या वस्तू खरेदी करण्याची असते हौस
कोणत्याही महिन्याच्या सहा तसेच पंधरा किंवा 24 तारखेला जन्म झालेल्या व्यक्ती या खूप श्रीमंत असतात. परंतु त्या प्रमाणात खर्चिक देखील असतात.

जीवनामध्ये या लोकांना अतिशय महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो व अशा पद्धतीच्या वस्तू घेण्यासाठी किती जरी पैसा खर्च करायचा असला तरी ते मागे पुढे विचार न करता पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च करतात व महागडी वस्तू विकत घेतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe