Kedar Raj Yoga:- नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक शुभ आणि अशुभ असे राजयोग तयार झाले असून अनेक राशींवर त्यांचा चांगला किंवा वाईट परिणाम पाहायला मिळणार आहे. जर आपण ग्रहांचा विचार केला तर ज्योतिष शास्त्रानुसार विशिष्ट काही कालावधीमध्ये ग्रह देखील राशी परिवर्तन करत असतात म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतात व यामुळेच शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात.
या सगळ्या स्थितीचा परिणाम हा पृथ्वीवर देखील दिसून येतो. यामध्ये काही योग असे असतात की ते कित्येक वर्षांनी तयार होत असतात. याच पद्धतीने पाचशे वर्षांनी केदार राजयोग तयार झाला आहे. हा योग तयार होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे सात ग्रह चार राशीत विराजमान असल्यामुळे हा शुभ योग तयार झाला आहे.
तसे पाहायला गेले तर बारा राशींवर याचा प्रभाव दिसणार आहे. परंतु त्यातील तीन राशी या धन आणि सुख समृद्धीच्या बाबतीत सरस करण्याची शक्यता आहे. पुढे या लेखांमध्ये त्या तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत? कोणत्या राशींना या केदार राजयोगाचा फायदा होणार आहे? याबद्दलची माहिती आपण घेऊ.
केदार राज योगामुळे ‘या’ राशींना मिळेल धनसंपत्ती
1- मिथुन– केदार राजयोग मिथुन राशींच्या व्यक्तींकरिता खूप वरदानदायक ठरण्याची शक्यता असून सध्या ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर मिथुन राशीच्या अष्टमस्थानी सूर्यदेव असून अकराव्या भावामध्ये शनिदेव भ्रमण करत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे मिथुन राशींच्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर धनलाभ होईल अशी शक्यता आहे.
जे व्यक्ती नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन मिळेल अशी देखील शक्यता आहे. तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी काही नवीन मार्ग निर्माण होऊ शकतील. एवढेच नाही तर मिथुन राशींच्या व्यक्तींना अनपेक्षितपणे काही आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना जर नवीन घर किंवा काही मालमत्ता खरेदी करायची असेल तर या कालावधीत ते करू शकतात.
2- मेष– मेष राशींच्या व्यक्तींकरिता हा राजयोग खूप फायद्याचा ठरणार आहे. केदार राज योगामुळे मेष राशींच्या लोकांना गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे व एवढेच नाही तर काही अनपेक्षितपणे पैसे देखील मिळू शकतात. मेष राशींचे व्यक्ती ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात देखील चांगले यश मिळण्याची शक्यता आहे व त्यामुळे संपत्ती आणि प्रतिष्ठा देखील वाढेल.
3- तूळ– हा राजयोग तुळ राशींच्या व्यक्तींकरिता देखील चांगले फळ देणारा ठरणार आहे. जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक क्षेत्रात फायदाच फायदा मिळेल अशी शक्यता आहे. कोणतीही गुंतवणूक केली असेल तरी फायदा होण्याची शक्यता आहे व जे व्यक्ती व्यापारी असतील त्यांना देखील चांगला नफा मिळू शकतो.
काही ठिकाणी पैसे अडकलेले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच अगोदर पेक्षा आर्थिक स्थिती भक्कम होण्याची देखील शक्यता आहे. तूळ राशीचे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतील त्यांना यश मिळण्याची देखील शक्यता असून कौटुंबिक वातावरण एकंदरीत आनंदी असू शकते.
( टीप– वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाहीत.)