ज्योतिष शास्त्रामध्ये राशींना खूप महत्त्व असून प्रत्येक राशीचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते व या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ज्योतिष शास्त्रामध्ये केला जातो. जर आपण राशीनुसार वैशिष्ट्ये पाहिले तर काही राशी या व्यवसायातील प्रगतीच्या दृष्टिकोनातून खूप अग्रस्थानी आहेत.
जर आपण अशा राशींच्या दृष्टिकोनातून बघितले तर जगातील बहुतेक अब्जाधीश अशा राशींचे लोक आहेत. काही विशिष्ट राशी संपत्ती कमावण्याच्या बाबतीमध्ये व कल्पनांमध्ये कायम पुढे असतात व इतर राशींचे लोक याचा विचार देखील करू शकत नाही. त्यामुळे या लेखात आपण अशा कोणत्या राशी आहेत ज्या संपत्ती किंवा पैसे कमवण्यामध्ये आघाडीवर असतात त्यांची माहिती घेऊ.
या राशींचे लोक पैसे कमावण्याच्या बाबतीत असतात सरस
1- सिंह राशी– सिंह राशीचे लोक कमाईच्या बाबतीत कायम पुढे असतात तसेच या राशीचा स्वामी सूर्यदेव आहे व सूर्य देवाला ग्रहांचा राजा मानला जातो. सिंह राशींच्या लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आत्मविश्वास असतो. तसेच त्यांचे मनोबल भक्कम असते व त्यामुळे त्यांना भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळते. जगातील प्रसिद्ध व्यक्तीचे उदाहरण घेतले तर एचसीएल टेक्नॉलॉजी या प्रसिद्ध आयटी कंपनीचे चेअरपर्सन शिव नाडर हे सिंह राशीचे व्यक्ती आहेत.
2- कुंभ राशी– कुंभ राशीचा शासक ग्रह हा शनिदेव आहे व शनीला न्यायाची देवता म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. शास्त्रानुसार असे मानले जाते की कुंभ राशीचे लोक कठोर परिश्रम करतात व त्यांना शनिदेव नक्कीच फळ देतो. शनि देवाच्या कृपेमुळे कुंभ राशींच्या लोकांना त्यांच्या पावलागणिक नशिबाची साथ मिळते. तसेच कुंभ राशीचे लोक हे कौटुंबिक व्यवसाय सांभाळण्यामध्ये आघाडीवर असतात. जर आपण कुंभ राशींमध्ये भारतातील उद्योगपतीचे उदाहरण घेतले तर अदानी समोरचे सर्वेसर्वा गौतम अदानी हे कुंभ राशीचे व्यक्ती आहेत.
3- कर्क राशि– कर्क राशीच्या व्यक्तींना कमाईच्या बाबतीत सरस मानले जाते. या राशीचा ग्रह चंद्र आहे व हा मन आणि मनोबलाचा कारक मानला जातो. कर्क राशींच्या लोकांचे मनोबल खूप मजबूत असते व व्यावसायिक बाबींमध्ये या राशीचे लोक खूप मोठ्या प्रमाणावर फायदे मिळवतात. कर्क राशिमध्ये जर आपण प्रसिद्ध उद्योगपतीचे उदाहरण घेतले तर आपल्याला एलोन मस्क यांचे घेता येईल.
4- वृश्चिक राशी– या राशीचे लोक देखील संपत्ती कमावण्याच्या बाबतीमध्ये खूप पुढे असतात. या राशीचा शासक ग्रह मंगळ आहे व ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर मंगळ ग्रह हा ग्रहांचा सेनापती समजला जातो. वृश्चिक राशीच्या लोक आश्चर्यकारक व महत्त्वाच्या योजना बनवतात व लोकांना प्रभावित करतात. या लोकांमध्ये असलेल्या अद्भुत कल्पनाशक्तीमुळे हे लोक त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठे यश मिळवतात. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स हे वृश्चिक राशीचे आहेत.
5- मेष राशी– मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो व ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर मंगळाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती आपल्या कामांमध्ये खूप भावुक असते. मेष राशीचे लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप प्रयत्नशील असतात व व्यवसायामध्ये देखील खूप प्रगती करतात. मेष राशीचे व्यक्ती त्यांच्या शौर्याच्या बळावर अनेक मोठे आव्हानांवर देखील मात करतात. भारताचे प्रसिद्ध अब्जाधीश मुकेश अंबानी हे देखील मेष राशीचे आहेत.