‘या’ राशी आहेत प्रभू श्रीरामांच्या अत्यंत आवडत्या! या राशींवर असते नेहमी श्रीरामांची कृपा, वाचा यामध्ये आहे का तुमची राशी?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काल संपूर्ण देशामध्ये राममय वातावरण झालेले होते व मोठ्या जल्लोषात आयोध्या या ठिकाणी राम मंदिराचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले व रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील करण्यात आली. प्रभू श्रीरामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात

व संपूर्ण भारतामध्ये अगदी मनोभावे श्रीरामांची पूजा केली जाते. जर ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा कृपाशीर्वाद काही राशींवर नेहमीच असतो.म्हणजेच त्या राशी या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आवडत्या राशी आहेत. त्यामुळे नेमक्या त्या राशी कोणत्या आहेत? त्याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

 या राशी आहेत प्रभू श्रीराम यांच्या आवडत्या

1- मिथुन ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर मिथुन राशीचे जे काही व्यक्ती आहेत ते रामाचे प्रिय व्यक्ती म्हणून मानले जातात. जीवनामध्ये जे काही संकटे येतात त्यापासून वाचवण्याचे काम श्रीराम नेहमी करत असतात. मिथुन राशीचे व्यक्ती हे नेहमी उच्च पदावर कार्यरत असतात व एवढेच नाही तर कोणतीही कठीण परिस्थिती आली तरी ते सहजरीत्या त्या परिस्थितीशी सामना करून त्या परिस्थितीचा निपटारा करतात. मिथुन राशीचे व्यक्ती हे भरपूर यश आणि प्रसिद्धी  देखील मिळवतात.

2- कर्क ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीचे व्यक्ती देखील रामाचे खूप प्रिय मानले जातात व त्यांच्यावर नेहमीच रामाची कृपा असते. कर्क राशीच्या व्यक्तींना प्रसिद्ध आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. प्रभू श्रीरामांच्या कृपेने कर्क राशींच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याचे संधी मिळते व या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये कायम सुख समृद्धी लाभत असते.

3- तूळ तूळ राशीच्या व्यक्तींवर रामाची नेहमी कृपा असते व या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे त्यामुळे हे लोक खूप धार्मिक असतात तसेच नेहमी विविध प्रकारचे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये कायमच उत्साहाने सहभागी होतात. रामाच्या आशीर्वाद असल्यामुळे ते कोणत्याही विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमी तत्पर व तयार असतात.

4- कुंभ ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे व हे लोक अत्यंत मेहनती असतात व त्यांच्यावर नेहमी रामाची कृपा असते. प्रचंड प्रमाणात कष्टाच्या जोरावर त्या आयुष्यात भरपूर प्रमाणात यश मिळवतात व प्रभु श्रीरामांचा आशीर्वाद असल्यामुळे वाईट परिस्थितीत देखील हार मानत नाही.

5- मीन या राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे व या राशी व श्रीराम यांची कृपा नेहमी असते. प्रभू श्रीरामांच्या कृपेने मीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये नेहमी धनसंपत्ती आणि समृद्धी आपल्याला दिसून येते. समाजामध्ये देखील मीन राशींच्या व्यक्तींना उच्चपद तसेच प्रतिष्ठा प्राप्त होते. एवढेच नाही तर त्यांना यश देखील भरपूर प्रमाणात मिळते.

( टीपवरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी कुठल्याही प्रकारचा दावा आम्ही करत नाहीत.)