file photo

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- राहुरीच्या लाभक्षेत्रात पुष्य नक्षञाच्या पावसाचा नववा दिवस देखील फेल झाला आहे. घाटमाथ्यावर पाऊस मंदावल्याने मंगळवारी दुपारपासून सायंकाळ पर्यंत कोतुळकडुन मुळाधरणात येणारी पाण्याची आवक देखील कमी झाली आहे.

मंगळवार सायंकाळी ६ वाजता मुळाधरणाचा पाणीसाठा १३ हजार ६८० दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ५३ टक्के भरले आहे.सकाळी ६ वाजता कोतुळकडुन मुळाधरणात ५ हजार ३२७ क्युसेकने, दुपारी १२ वाजता ४ हजार २२७ क्युसेकने, ३ वाजता ३ हजार ६२७ क्युसेकने तर सायंकाळी ६ वाजता ३ हजार ४१६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

मागील वर्षी आजच्या दिवशी सकाळी ६ वाजता कोतुळ कडुन मुळाधरणात १०६१ क्युसेकने तर सायंकाळी ६ वाजता ९७७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. १९ जुलैला पुष्य नक्षत्रास सुरवात झाल्याने समाधानकारक पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकरी आभाळाकडे डोळे लावुन बसले आहेत.

माञ या नक्षत्रातील मंगळवारचा नववा दिवस देखील फेल गेला आहे. मागील वर्षी २७ जुलै २०२० रोजी मुळा धरणातील पाणी साठ्याची १० हजार ६७० दशलक्ष घनफूट तर कोतुळ १ मिलीमीटर,मुळानगर २६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.