अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालूक्यातील वांबोरी येथे मुले खेळत असताना फुटबॉल लहान मुलीला लागला. या कारणावरुन वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आठ जणांनी मिळून इमरान खान यांना व त्यांच्या पत्नीला दगड व लाथा बूक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना दिनांक ३० जुलै रोजी घडली आहे.

राहुरी तालूक्यातील वांबोरी येथे काही मुले फुटबॉल खेळत होती. त्यावेळी इमरान शफी खान यांच्या मुलीला फुटबॉल लागला होता. दिनांक ३० जुलै रोजी रात्री साडेदहा वाजे दरम्यान इमरान शफी खान हे त्याच्या घरासमोर उभे असताना आरोपी आरिफ खान हा त्यांना म्हणाला की, तु माझ्या मुलाला काय म्हणाला.

तेव्हा फिर्यादी इमरान खान त्याला समजावुन सांगितले की, तुझा मुलगा फुटबॉल खेळत असतांना फुटबॉल हा माझ्या लहान मुलीला लागला. म्हणुन मी त्यास खेळतांना इकडे तिकडे पाहुन खेळण्यास सांगितले होते. असे सांगण्याचा राग आल्याने आरोपींनी इमरान खान व त्यांची पत्नी हिना यांना शिवीगाळ करत दगड व लाथा बुक्कयांनी मारहाण केली.

आणि जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या घराचे लोखंडी गेट तोडुन नुकसान केले. इमरान शफी खान यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आरिफ हसनमियाँ खान, सादिक हसनमियाँ खान, समिर हसनमियों खान, नासिर हसनमियाॅ कोतवाल, शेहबाज नुरमहंमद खान,

शकुर नुरमहंमद खान सर्व राहणार वांबोरी तसेच इरफान हानिफ शेख, शाईन हानिफ शेख दोघे राहणार विळद ता. नगर. या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिनकर चव्हाण हे करीत आहेत.