file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- गेल्या काही दिवसांत हॅकर्सनी नवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. फक्त एका SMS द्वारे तुमचं बँक खातं हॅक करण्याची टेकनिक हॅकर्सनी शोधली आहे.

हॅकर्स तुमच्या फोनवर एक मेसेज पाठवून अगदी सहज तुमच्या खात्याचे डिटेल्स मिळवू शकतात आणि तुमचं अकाऊंड रिकामं होऊ शकतं त्यामुळे ग्राहकांना सावध राहायला हवं.

शक्यतो आपली कोणतीही माहिती फोनवर देऊ नका असाही सल्ला देण्यात येत आहे, यूझर्सला KYC व्हेरिफिकेशनचा एक मेसेज येतो. याच मेसेजवर अनेक ग्राहक फसतात.

तुम्ही जर हे व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुमच्या सीमची सेवा पुढच्या 24 तासांत बंद करण्यात येईल असं सांगण्यात येतं. हा एक मोठा घोटाळा आहे आणि त्याद्वारे पैसे लुटण्याचं षडयंत्र असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ट्वीटरवरही अनेक लोकांनी या फ्रॉड मेसेजबाबत माहिती दिली आहे. 9114204378 या क्रमांकावरून एक मेसेज येतो. जर हा मेसेज तुम्हाला आला असेल तर तुम्ही तातडीनं 8582845285 या नंबरवर तातडीनं फोन करायला हवा.

तुम्ही जर अशा फोन किंवा SMSला रिप्लाय दिला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपली कोणतीही माहिती अशा SMS वर किंवा कोणालाही फोनवर देऊ नका असं आवाहन करण्यात आलं आहे.