file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- तू माझी झाली नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही असे म्हणत एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना लोणीत घडली आहे.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल आबासाहेब अंत्रे (वय 30) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, लोणी बुद्रुक गावातील एक 29 वर्षीय तरुणी रस्त्यावरून जात असताना तेथे राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील अमोल आबासाहेब अंत्रे (वय 30) याने मोटरसायकलवरून येऊन तरुणीच्या स्कुटीला मोटारसायकल आडवी लावली.

त्यानंतर तरुणीचा हात धरून तू जर माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही. मी माझे किंवा तुझ्या जीवाचे काहीपण बरे वाईट करून टाकीन, अशी धमकी देत तरुणीचा विनयभंग केला.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान जिल्ह्यात आजही महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढच होताना दिसत आहे. महिला, तरुणी यांच्या विनयभंगाच्या घटना पाहता महिलांच्या अस्तित्वाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.