file photo

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  लसूण हा प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये उपलब्ध होणारा पदार्थ आहे. लसूण आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. साधारणत: भारतीय आहारात मोठ्या प्रमाणात लसणाचा वापर केला जातो. एखादी भाजी असो वा डाळ, पदार्थ रुचकर बनवण्यासाठी त्याला हमखास लसणाचा तडका दिला जातो.

लसणात अनेक प्रकारची खनिजे , व्हिॅमिन्स व रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारे पोषक तत्व सामावलेले असतात. रोज लसूण खाल्ल्याने प्रकृतीमध्ये सुधारणा होते. सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं शरीराला सर्वाधिक लाभ मिळतात. यामुळे काय फायदे होतील हे जाणून घेऊयात.

वजन कमी करण्यास फायदेशीर :- लसणामध्ये अँटी-ओबेसिटी गुणधर्म असतात. या घटकामुळे वजन कमी होण्यास मदत होते. लसणामुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होतात.

यातील औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. लसूणच्या तेलामध्येही अँटी ओबेसिटी घटक असतात, जे वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतं. नियमित सकाळी पाण्यासोबत लसूण खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतील.

मधुमेहावर नियंत्रण :- लसणात एलिसिन नामक एक तत्व असते जे ब्लड शुगर नियंत्रित करण्यास लाभदायक ठरतं. जर तुमची ब्लड शुगरची पातळी वाढली असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्यासोबतच दिवसातून दोन वेळा तरी लसणाच्या पाकळ्या कच्च्या चावून खाल्ल्या पाहिजेत.

कच्चे लसूण खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. मधुमेह, नैराश्य आणि कित्येक प्रकारच्या कॅन्सरमुळे तुमचा बचाव देखील होऊ शकतो.

लसूणमध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. मधुमेहींसाठी लसूण अतिशय लाभदायक आहे. एक ते दोन आठवडे लसूणचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबत यामुळे कोलेस्ट्रॉल ची पातळी देखील संतुलित राहते.

सर्दी- खोकल्यावर गुणकारी सर्दी :- खोकला, तापाचा त्रास झाल्यानंतर लसूण खाल्ल्यास अराम पडतो. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते.

श्वसनाच्या समस्या :– श्वसन समस्यांसाठी आपण लसूण घेऊ शकता. लसणाच्या कळीला मीठाबरोबर खाल्ल्याने फायदा होतो.

कोलेस्ट्रॉल :- लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे खाऊ शकता. असे केल्याने हृदय निरोगी राहते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.

पोटाचे रोग :– लसूण सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. लसण्याच्या रसाबरोबर तुम्ही मीठ, तूप आणि भाजलेली हिंग खाऊ शकता. हे आपल्या पाचक प्रणालीस ठीक ठेवण्यास मदत करते.