file photo

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- चक्क डोक्याला गावठी कट्टा लावून खुन करण्याची धमकी देत खिशातील २५ हजार रुपये रोख व सोन्याची अंगठी लंपास केली आहे. ही घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, छावा संघटनेचे देवेंद्र लांबे हे वाघाचा आखाडा येथे जात होते.

ते नंदिनी हॉटेलच्या जवळ असताना पाठीमागुन एका मोटारसायकलवर विजय अण्णासाहेब मकासरे एक अनोळखी इसम असे दोघे आले. मकासरे शिवीगाळ करत समोरून समोरुन त्याची मोटारसायकल आडवी लावली. गाडीवरुन उतरुन पाठीमागे बसलेल्या अनोळखी इसमाने गचांडी पकडून तु आता जास्त समाजकार्य करतो काय असे म्हणून झटापट केली.

त्यावेळी मकासरे याने गावठी कट्टा कानावर लावला व मला म्हणाला तु लई समाजकारण करतोस काय तुझ्यावर अ‍ॅट्रोसिटी करुन तुला संपवतो. असे म्हणत तु जर हालचाल केली तर तुला गोळी घालुन संपवुन टाकीन अशी धमकी दिली.

या दरम्यान अनोळखी इसमाने लांबे यांच्या पॅन्टच्या खिशातील २५ हजार रुपये रोख व हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढुन घेतली. त्यानंतर लांबे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता त्याठिकाणी लोक जमा होवु लागल्याने ते दोघे मोटारसायकलसह पळुन गेले. याबाबत त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.