अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  वीज वितरण व महापारेषण कंपनीकडून देखभालीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला, त्यामुळे शहरातील उपनगर भागात एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर, महानगरपालिकेकडून अमृत पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. दरम्यान, शहर पाणीपुरवठा योजनेवरील विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार आहे.

त्यामुळे पाणी वितरणाच्या टाक्या भरता येणार नाहीत. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातील बोल्हेगाव, नागापूर, सावेडी गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मी नगर, सु

र्या नगर, निर्मल नगर, मुकुंदनगर स्टेशन रोड, शिवाजी नगर परिसर या भागात रविवारी (२४ ऑक्टोबर) पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात सर्जेपुरा,

मंगल गेट, जिल्हाधिकारी कार्यालय, दाळ मंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी, प्रोफेसर कॉलनी,

सिविल हडको, प्रेमदान हडको‌आदी भागात सोमवारी (२५ ऑक्टोबर) पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.