अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- बेरोजगारो वाढली आहे यामुळे रोजगारासाठी अनेकांची धडपड सुरु असते. यातच सरकारी नौकरी मिळावी यासाठी अनेक जण जीवाचे रान करत असतात.

याचाच फायदा घेत काही भामटे नौकरी लावून देण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक करतात. असाच प्रकार जिल्ह्यात घडला आहे. तलाठी पदाची नोकरी लावुन देतो असे सांगुन खोटे नियुक्ती पत्र दाखवुन 18 लाख 47 हजार 700 रुपयांची फसवणुक करणार्‍या भामट्याविरुद्ध अकोले पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

मात्र तेव्हापासून तो फरार होता. अखेर 1 ऑगस्ट रोजी त्यास पुणे येथे अटक करण्यात आली आहे. विजयकुमार पाटील (रा. कंचन कंपर्ट कोंढवा, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. विजयकुमार गुन्हा दाखल झाल्या पासून तो फरार होता. अखेर दिनांक 1 ऑगस्ट रोजी अकोले पोलिसांचे पथक रवाना करून त्यास पुणे येथे ताब्यात घेतले आहे.

या आरोपीस न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी शेखर नंदु वाघमारे यांनी अकोले पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली होती. विजयकुमार श्रीपती पाटील व नितीन गंगाधर जोंधळे (रा. कोकणगाव, ता, संगमनेर जि. अ.नगर) यांनी तुला तलाठी पदाची नोकरी लावुन देतो असे

सांगुन खोटे नियुक्ती पत्रे दाखवुन फिर्यादीस विश्वासात घेवुन फिर्यादीकडुन वेळोवेळी रोख तसेच बँकेद्वारे एकुण 18,47,700 रुपये घेवुन तलाठी पदाची कुठलेही नियुक्ती पत्र न देवुन फिर्यादी यांची फसवणुक केली. फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.

सदर गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपी विजयकुमार श्रीपती पाटील (रा. कंचन कंपर्ट कोंढवा, पुणे) हा त्याचे राहते घरी मिळुन येत नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुुुन घुगे यांनी पोलीस पथक तयार करुन त्यांना सूचना दिल्या.अखेर लाखो रुपांयाची फसवणुक करणारा हा भामटा पोलिसांनी जेरबंद केला आहे.