file photo

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :-  मोहरमच्या पार्श्वभूमीवर कोठला परिसरामध्ये तोफखाना पोलिसांच्या पथकाने पाहणी करून आढावा घेतला आहे, दरम्यान या संदर्भामध्ये तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी कोरोना नियम सर्वांनाच लागू आहे त्यामुळे या ठिकाणी दर्शन व्यवस्था ही बंद करण्यात आलेली आहे.

जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कायदेशीर रित्या कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. नगर शहरामध्ये मोहरम सण हा मोठा उत्सवामध्ये दर वर्षी साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर कोठला परिसरामध्ये ज्या ठिकाणी सवारी स्थापन केली जाते, त्या ठिकाणची पाहणी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

या ठिकाणी कशा पद्धतीने बंदोबस्त करायचा याची सुद्धा त्यांनी या ठिकाणी पाहणी केली. यानंतर बोलताना तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योती गडकरी यांनी कोरोनाची महामारी अजून संपलेली नाही.

राज्य शासनाने जे नियम व अटी घालून दिलेल्या आहेत त्याचे तंतोतंत पालन सर्वांनीच केले पाहिजे. याबद्दल दुमत नाही, आजही धार्मिक स्थळे सर्वत्र बंद आहे. त्या पद्धतीनुसार या ठिकाणी सुद्धा नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.

तरी कोणीही दर्शनासाठी येथे येणार असेल तर त्यांना सुद्धा प्रवेश दिला जाणार नाही. व त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. जर तुम्ही नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.